अहील्याबाई सभागृहात अश्लील चाळे करणाऱ्या त्या युवकास बदळले !



जगावर अधिराज्य गाजवणारी लोकमाता अहील्यादेवी होळकर यांचे कार्य सर्वश्रुत आहे.त्या मातेच्या नावाने फडणवीस सरकारने 25/15 या निधितून मोजक्या ठिकाणी अहील्याबाई होळकर सामाजिक सभागृह बांधण्यात आले.मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथेही सभागृह बांधण्यात आले.त्या सभागृहात अनेक युवक रात्रीचा व दुर्लक्षित पणाचा फायदा घेत अश्लिल चाळे करत आहे.अश्याच एका युवकाचा रात्री अश्लील चाळे करत असतांना गावातील युवकांनी चांगलाच चोप दिला.


              जुनासुर्ला येतील शक्ती माता मंदिराच्या मोकळ्या जागेत सभागृह बांधण्यात आले आहे.या सभागृहाचे बांधकाम पुर्ण झाले असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतला हस्तांतरित केली आहे.त्यामुळे हे सभागृह दुर्लक्षित झाले आहे.यापुर्वी रितसर उद्घाटन धनगर समाजाचे संजय कन्नावार यांनी करण्याचा प्रयत्न केला.मात्र गावातील काही प्रतीष्ठीत पदाधिकाऱ्यांनी बहुप्रतिक्षित असलेल्या उद्घाटनाला विरोध दर्शवित उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आले.त्यामुळे सभागृहाकडे कुणाचेही लक्ष नसल्याने प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे.त्यामुळे या सभागृहाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कि ग्रामपंचायतचे दुर्लक्ष आहे हे कळायला मार्ग नाही. इतकेच नव्हे तर या सभागृहाचे दरवाजे, कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून अश्लील चाळे करण्यासाठी मोकळे आहे.काही युवकांनी यावर पाळत ठेवत रात्री अश्लील चाळे करणाऱ्या युवकांचा चांगलाच समाचार घेतला.