गडचिरोली जिल्ह्यात संतप्त ग्रामस्थांनी पेटवली १२ ट्रक



गडचिरोली : जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातून सुरजागड प्रकल्पातून होणाऱ्या खनिज वाहतुकीने आज पुन्हा एका निरपराध महीलेचा नाहक बळी गेला आहे. या अपघातात सदर महीला ठार झाल्याने संतप्त झालेल्या जमावाने वाहने 12 ट्रक पेटवून दिले आहे.या घटनेतील बिजोली सुभाष जयदार असे मृतक महीलेचे नाव आहे. पती सुभाष जयदार हे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शांतीग्राम नामक गावानजिक घडली.
सूरजागड येथून खनिज वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक ने दुचाकी स्वारास धडक दिली. या धडकेत महीलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. चंद्रपूर - आल्लापली महामार्गावरील शांतीग्राम गावानजीक ही दुर्देवी घटना घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने 10 ते 12 ट्रक पेटविले. त्यामुळे मुलचेरा तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.