अतूल भाऊ गण्यारपवारांच्या वाढदिवसी डोळे तपासणी, मोतिबिंदू, कृत्रिम मोतीबिंदू व भिगारोपण शिबिर संपन्न



लॉयन्स आय सेंटर, सेवाग्राम, वर्धा, लॉयन्स क्लब चंद्रपुर महाकाली, महाविर इंटरनॅशनल चंद्रपुर सेंटर, चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्या चामोर्शी, यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १५/०९/२०२२ रोज गुरूवार ला कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह, चामोर्शी येथे माजी जी. प. सभापती गडचिरोली तथा कृषी उत्पन बाजार समिती सभापती मा. अतुलभाऊ गं. गण्यारपवार यांनी पुढाकार घेवून वरिल संस्थांना सोबत घेवून विनामुल्य मोतीबिंदु डोळे तपासणी तथा कृत्रिम मोतिबिंदु भिंगारोपण शिबीराचे आयोजन केले. सदर शिबिरामध्ये चामोर्शी तालुक्यातील १२०० रुग्णांनी सहभाग नोंदविले असुन त्यापैकी ७३१ रूग्णांची नोंदणी केली त्यामुळे त्या रूग्णांची प्रत्यक्ष तपासणी सेवाग्राम मेडीकल कॉलेज, लॉयन्स आय हॉस्पीटलचे मुख्य डॉ. अजय शुक्ला साहेब व इतर वैद्यकिय अधिकायांच्या चमु द्वारे तपासनी करण्यात आली यापैकी २३४ रूग्ण नेत्र तपासणी मध्ये शस्त्रक्रिया करीता पात्र झाले व त्याच दिवशी ६४ रूग्णाना ऑपरेशन करीता सेवाग्राम येथिल रूग्णालयात रूग्णावाहीका व टॅव्हल्स द्वारे पाठविण्यात आले. उर्वरित रूग्णांना दिनांक १७.०९.२०२२, २४.०९.२०२२८/१०/२०२२ ला ऑपरेशन (शस्त्रक्रिया) करिता नेण्यात येणार आहे.



तसेच ३ महिण्यात ४०० रूग्ण ऑपरेशन करिता पात्र होणार असल्यामुळे त्यांची व्यवस्था डिसेंबर व जानेवारी मध्ये तपासणी करून ऑपरेशन करिता नेण्यात येणार आहे. व त्याकरिता पुन्हा शिविर घेण्याचे माजी सभापती मा. अतुलभाऊ गं. गण्यारपवार यांनी जाहीर केले. या शिबिरामध्ये चामोर्शी तालुक्यातील अनेक गावामधून रूग्ण आले सर्व रूग्णांना थंड पिण्याचे पाणी, चहा, नास्ता, व मसालाभाताची व्यवस्था करण्यात आले..

मा. श्री. अतुलभाऊ गंगाधरराव गण्यारपवार यांचे मार्गदर्शना खाली सेवाग्राम वर्धा येथे शस्त्रक्रियेसाठी २३४ पैकी ६४ नेत्र रुग्णांना तात्काळ पाठविण्यात आले. मोतीबिंदू नेत्र तपासनी करिता सेवाग्राम येथिल सुसज्ज टिम येवून तपासणी करण्यात आली. ज्या रूग्णांना साधना अभावी स्वः गावी परत जाण्यासाठी एस टी बसेस सुटल्या त्या रूग्णांना खाजगी वाहन करून घरी सुखरूप पोहचविण्यात आले. यापुर्वी सुध्दा २७० लोकांचे ऑपरेशन करून त्यांना वरिल संस्थांच्या वतिने चष्मेसुध्दा वाटप करण्यात आले. त्यामुळे सर्व रूग्णांनी आनंद व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी सभापती जि. प. गडचिरोली तथा कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती मा. अतुलभाऊ ग. गण्यारपवार, महाविर इंटरनॅशनल, चंद्रपूरचे अध्यक्ष मा. हरिष मुथा, महाविर इंटरनॅशनल, चंद्रपूरचे सचिव मा. मनीष खटोड, महाविर इंटरनॅशनल विदर्भ झोन चे चेअरमन मा. दिलीप भंडारी, मा. पुनमजी तिवारी, मा. किरण चेनवेनवार, मा. विमल देसाई, मा. डॉ. अजय शुक्ला सेवाग्राम मेडीकल कॉलेज लॉयन्स आय हॉस्पीटल, सेवाग्राम, मा. श्री. अमोलभाऊ गं. गण्यारपवार नगरसेवक न.पं. चामोर्शी तथा संचालक, जि. मध्य. सह. बँक गडचिरोली, माजी प. स. सदस्य मा. सुरेश परसोडे, माजी सरपंच मा. मधुकर चिंतलवार, चा, ता. सह. खरेदी विक्री संघ मर्या. चामोर्शीचे माजी अध्यक्ष मा. गुरूदास पा. चुधरी, उपाध्यक्ष मा. मुरलीधर डो. बुरे, जि. मध्य. सह. बँक गडचिरोली संचालक मा. बंडूजी ऐलावार, संचालक मा. अरूण पुल्लनाजी बंडावार, संचालक मा. शामराव पा. पोरटे, संचालक मा. अरूण लाकडे, संचालीका मा. मंजूषा चलकलवार, सरपंच मा. सुधाकरजी गद्रे, सरपंच मा. कुंदाताई नरेंद्र जुवारे, मा. मधुकर बोदलकर, उपसरपंच मा. रामचंद्र ब्राम्हणकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी मा. भंडारे, उपसरपंच मा. विनोंद शेंगर, मा. गुलाबसिंग धोती, मा. गुरूदास गलाई, मा. राकेशभाऊ मुरकुटे, सरपंच मा. सुनिलभाऊ कुळमेथे, माजी सरपंच मुरमुरी मा.संतोष किरमे, प्राचार्य मा. धोटे सर, प्राचार्य मा. मडावी सर, प्राचार्य मा. नागोसे सर, मुख्याध्यापक मा. तातावार सर, मुख्याध्यापक मा. दुमणे सर, मा. विलास सर, व्यवस्थापक राकेश जे. पोरटे, निरिक्षक नरेश घेर, मधुकर जे. गव्हारे मुख्याध्यापक, मा. सचिन चलकलवार, चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे सर्व कर्मचारी वृंद, शरदचंद्र पवार कला महीला महविद्यालयाचे संपूर्ण लेक्चरर स्टॉप व विद्यार्थिनी स्वयंसेवक म्हणून उपस्थित होते, स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालय, घोट, स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार मराठी प्राथमिक विद्यालय, चामोर्शी, डिज्नीलॅन्ड प्रेसीडेन्सी इंग्लीश मिडीअम स्कुल, चामोर्शी, भारतरत्न राजीव गांधी विद्यालय, मुळखळा, त्यागमुर्ती सोनिया गांधी विद्यालय, मोहुर्ली परमपुज्य माहात्मा गांधी विद्यालय, घोट यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे कार्य केले.