चंद्रपूर :- मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील काही समाज घातकी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून धनगर जमातीतील झाडे पोटजात असलेल्या एनटी सी प्रवर्गाची पदे बळकावली जात आहे.याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली आहे.मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.धनगर जमातीतील ३८ पोटजाती वर अन्याय होत आहे.त्यामुळे बोगस झाडे समाजातील पदे बळकविलेल्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यात साधारणतः धनगर व कुरमार ही पोटजात आढळून येते मात्र झाडे ही पोटजात अजिबात नाही.तरीसुध्दा बनावट कागदपत्रांच्या आधारे ही रिक्त पदे बळकावली जात आहे.त्यामुळे धनगर समाजातील होतकरु तरूणांचे नाहक नुकसान होत आहे.
शासन प्रशासनाने वेळीच जातीने लक्ष घालून आतापर्यंत झाडे या पोटजातीत नोकरीवर लागलेल्या तरूणांचे कागदपत्रांची योग्य ती चौकशी केल्यास पुर्णतः गबाळ बाहेर येईल.या सर्वांची सन १९६१ ची वडीलोपार्जीत दाखले , कोतवाल पंजी मागविण्यात यावी .नुकताच सुरू असलेल्या पोलीस भरतीत धनगर कुरमार जमातीतील तरूणावरील अन्याय दुर करावा असे संजय कन्नावार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.