वरसिद्धी' मॉलमुळे रस्त्यांवर वाढलेल्या गर्दीमुळे अपघातांत वाढ होण्याची शक्यता?



चंद्रपूर (वि.प्रति.)
चंद्रपूर शहरातील अरूंद व जिवघेणे रस्ते हा नेहमी चर्चेचा व वृत्तांचा विषय राहिलेला आहे. शहरात दोनचं मुख्य रस्ते आहेत. गांधी चौकातुन जटपुरा गेट पर्यंत जाणारा रस्ता व जटपुरा गेट पासून गांधी चौकापर्यंत येणारा रस्ता हाच चंद्रपूर शहराचा रिंग रोड म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातचं रस्त्यावर मुख्य रस्त्यांवर झालेले अतिक्रमण, पार्किंग ची अव्यवस्था यासाठी एखादी दुर्घटना घडल्यानंतरचं राजकीय पक्षांना व नेत्यांची झोप उघडते.
जटपुरा गेट कडून कस्तुरबा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नुकतेचं ‘वरसिद्धी शॉपींग मॉल'चे मोठ्या थाटात सैराट सिनेमाची अभिनेत्री रिंकु राजगुरू (आर्ची) हिच्या हस्ते उद्घाटन झाले. जिल्ह्यातील मोठ-मोठ्या नेत्यांनी या मॉलला भेट दिली. आर्चीच्या हस्ते उद्घाटित झालेल्या या शॉपींग मॉलमध्ये तोबा गर्दी करीत आपली दिवाळी साजरी केली. परंतु या मॉलच्या उद्घाटनानंतर शहरातील अरूंद आणि जिवघेण्या रस्त्यांची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.


या माल मध्ये पार्किंगच नाही !

ज्युबिली शाळेपासून श्रीकृष्ण टॉकीजपर्यंत जायला २० ते २५ मिनीटांचा अवधी लागतो, एवढी प्रचंड गर्दी चारचाकी, दुचाकी वाहनांसोबतचं पायदळ चालणाऱ्यांची होत आहे. मॉलमध्ये येणारे मॉलजवळचं आपल्या दुचाक्या पार्क करीत असतात. वरसिध्दी मालच्या इमारती खाली फक्त दोन चारचाकी वाहन व ३० दुचाकी वाहन राहुल शकतात इतकीच जागा आहे.उद्घाटनापुर्वीच पार्किंगची व्यवस्था करणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे.मात्र व्यवस्थापकांनी पार्किंग ची व्यवस्था न करता सरळ उद्घाटन समारोह आटोपून घेतला मात्र आता पार्किंग व्यवस्था भेडसावत असल्याने दर्शनी भागात पार्किंग ची व्यवस्था चिंतावार ट्रेडर्स मध्ये करण्यात आल्याचा बोर्ड लावला आहे. वरसिद्धी मॉलपासुन चिंतावार ट्रेडर्स ही जवळपास ५००मिटर पेक्षा जास्त अंतरावर आहे. या मॉलच्या मालकाने सुरक्षा रक्षक नियुक्त केले आहे. ते कशासाठी हे कळायला मार्ग नाही. कारण मॉलजवळचं जिथे जागा मिळेल तिथे दुचाकी पार्किंग केलेल्या नजरेत पडतात. त्यासोबतचं या मॉलमध्ये जाणारे ग्राहक यामुळे रस्त्यावरील गर्दी ही नियंत्रणाबाहेर गेलेली आहे. रस्त्यावर वाढलेली वाहनांची गर्दी त्यामुळे वाहतुक कर्मचारी त्रस्त झालेले आहे.वाहतुक नियंत्रण अधिकाऱ्यांनी याठिकाणी आपले दोन कर्मचारी नियुक्त केले आहे.मात्र इतक्या मोठ्या वाहतुकीला दोन कर्मचारी काय करू शकणार हे मात्र वाहतूक नियंत्रण निरीक्षकांनांच ठाऊक!

मनपाच्या प्रसाशकांवर संशयाची सुई !

बरखास्त झालेली चंद्रपूर शहर मनपा चा कारभार सध्या प्रशासक सांभाळत आहे. वरसिध्दी माॅलचे इमारत बांधण्यापुर्वी भाजपाची सत्ता होती.आणि त्यावेळी महापौर राखीताई कंचर्लावार या होत्या.तेव्हा इतक्या मोठ्या माॅलला बिना पार्किंग बा़धकाम परवाना कसे काय दिले.हे न समजणारे कोड आहे ‌.आणि आता मनपा प्रशासनाने रस्त्यावर वाढलेली वाहनांची गर्दी, पार्किंग ची व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास याकडे केलेली डोळेझाक ही संशयास्पद आहे. एखादा मोठा दुर्घटना यामुळे घडली तर त्यासाठी जबाबदार कोण राहिल उद्घाटनासाठी आलेली आर्ची की या मॉलला भेट देणारे नेते ? असा प्रश्न आज सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. त्वरित या मॉलची पार्किंग व्यवस्था व रस्त्यांवर होणारी गर्दी यावर अभ्यास करून मनपा प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे.