पत्रकारांचा वाढता जन्मदर आणि वैतागलेले जाहिरातदार....!



दिपावली विशेषांक काढण्याच्या प्रथेला आज शतकापेक्षा जास्त काळ उलडला आहे. कथा, कविता, लेख, नाटक आदी विषयांवर भाष्य करणारा एक अंक १९०५ मध्ये दिवाळीच्या कालावधीत निघाला. बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या मित्रोदय' मासिकाने 'नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ' असा उल्लेख करुन काढलेला हा अंक! या मासिक अंकापासूनच दिवाळी अंकाच्या परंपरेला सुरुवात झाली असे सांगतात. त्यातचं 'मनोरंजन' चा १९०९ साली मराठीत प्रसिद्ध झालेला पहिला दिवाळी अंक. कै. काशिनाथ रघुनाथ मित्र यांनी संपादन केल्याचा काही ठिकाणी उल्लेख आहे. त्यानंतर अनेक वृत्तपत्रांची या प्रथेला सुरू ठेवत आपल्या वृत्तपत्राचे दिवाळी अंक काढण्याची परंपरा जोपासली. आज अनेक प्रादेशिक, स्थानिक वर्तमानपत्रे आपापला दिपावली विशेषांक प्रकाशित करीत असतात. जाहिरातीशिवाय दिपावली विशेषांक प्रकाशित होत नसतात. पुर्वी दिपावली विशेषांकामध्ये आपल्या प्रतिष्ठानाची किंवा वैयक्तिक जाहिरात प्रकाशित होणे म्हणजे फार मोठा सन्मान समजला जायचा. त्यानंतर पत्रकारितेमध्ये अनेक आधुनिक बदलाव आले, आज पत्रकारांची वाढती संख्या आणि वैतागलेले जाहिरातदार यासाठीचं हा लेखप्रपंच...!


पत्रकारांचा वाढता जन्मदर आणि वैतागलेले जाहिरातदार !

आज पत्रकारांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दरवर्षी ती वाढतचं जात आहे, याचे कारण काय असे विचारले जाते. तर त्यावर उत्तर देणे अशक्य आहे. जन्मदरांपेक्षा मृत्युदर हा कमी आहे, त्यामुळेचं लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. परंतु पत्रकारांचा जन्मदर हा वाढतचं आहे आणि मृत्युदर मात्र शुन्यात असल्यामुळे पत्रकारांची संख्या वाढली आहे. त्यात ही पत्रकार किंवा संपादक किती हा संशोधनाचा विषय आहे. अनेकांचा पत्रकारीतेशी कोणताच संबंध नसणारे ही दिपावली च्या शुभेच्छा जाहिरातींसाठी /दिपावली मध्ये सहयोगासाठी दिपावलीमध्ये आढळतात. ज्यांना कधी बघितले ही असे कलंदर दिपावली मध्ये सहयोग (भिक मागायला म्हटल्यास हरकत नाही?) मागायला फिरत असतात, विद्वतेच्या बाता करणे, दुसऱ्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ असा सांगणाऱ्यांची व शब्दांची किंवा वृत्ताची जाण नसणारे हजारोंच्या संख्येने आज स्वतःला पत्रकार संबोधतात. यात जे खरेचं पत्रकार आहेत. ज्यांच्या वृत्तपत्रांचे विशेषांक दिपावली मध्ये निघतात. त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकांनी तर दिपावली मध्ये फिरून 'कलेक्शन' करून पैसा जमावयाचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचा परिणाम दिपावली मध्ये विशेषांकासाठी जाहिरात देणारे वैतागलेले आहे, स्वतःचा फोन बंद ठेवणे, पत्रकारांचा फोन आला तरी न उचलणे असले प्रकार जाहिरातदार व लोकप्रतिनिधींकडून होत आहेत. वर्षभर वर्तमानपत्रातुन आपण केलेले न केलेले कार्य प्रसारित करायचे. त्यांच्या कटिंग जोडायच्या व एखाद्या पक्षाचे मोठे पद आणायचे. त्यावेळी अशा लोकप्रतिनिधींना वृत्तपत्रांची गरज भासते आणि दिपावलीच्या वेळी सहयोगाची वेळ येते तेंव्हा मात्र येणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे, त्यामुळे तुम्ही एवढ्याची जाहिरात टाका किंवा जाहिरात टाकुचं नका एवढ्यातचं भागवा असे म्हणणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दिवाळीत पत्रकारांना सहयोग म्हणुन काही अधिकारी आर्थिक सहयोग करतात, त्यात पत्रकारांची वाढलेली संख्या हा त्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखीचा विषय आहे. मोठ्या वर्तमानपत्राच्या पत्रकारांना कंपनीकडून तर 'टार्गेट' दिले जाते, ते पुर्ण करण्यासाठी करावी लागणारी मारामार यामुळे अनेकांनी पत्रकारितेला बाय-बाय केला आहे. एस. शंकर यांनी अनिलकपुर यांची शिवाजीराव नावाची मुख्य भुमिका असलेला 'नायक' नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यात अनिलकपुर हे कॅमेरामॅन असतात तर जॉनी लिवर ह्यांची स्पॉट बाय ची भुमिका असतो. त्यात नायक अनिलकपूर याला मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यायला लावतात. त्या चित्रपटापासून प्रेरित होऊन 'टोपी' ची भुमिका निभावणाऱ्या जॉनी लिव्हर सारखे अनेक जण आज पत्रकारितेत फक्त पैसा कमविण्यासाठी उतरले आहेत. ज्याच्या खिशात मोबाईल तो प्रत्येक जण आज पत्रकार असल्यासारखा वागत आहे. एखादा शब्द ही लिहीता न येणारे अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करून आपले मोठेपणा सिद्ध करण्याचा करीत असलेला प्रयत्न चिंतेचा विषय आहे. चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती बघितली तर ज्यांचे दुर-दुरपर्यंत वर्तमानपत्राशी किंवा न्युज पोर्टल शी संबंध नाही असे महाठग' स्वतःचे नसलेल्या वर्तमानपत्र/न्युज पोर्टल चे लेटपॅड आणि व्हिजीटिंग कार्ड घेऊन फिरतात. असल्या नाजायज पत्रकारांवर वचक बसायला हवा. यासाठी पाऊल उचलणे गरजेचे आहे. स्वतःला पत्रकार म्हणवुन अधिकारी व जाहिरातदारांवर दिपावलीच्या काळात उगवणाऱ्या या नाजायज पत्रकारांना वेसन घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. नाजायज पत्रकारांमुळे जाहिरातदारचं नाही तर अधिकारी वर्ग ही वैतागलेले आहेत. अशा नाजायज पत्रकारांच्या “पेकाट्यात शंभर हाणुन एक मोजावे!” त्यासाठी चंद्रपूर जिल्हा माहिती अधिकारी यांनी अधिकृत पत्रकार व संपादकांची शासकीय यादी पोलिस अधिक्षकांकडे दिल्यास हे शक्य होऊ शकेल, अशी अपेक्षा या दिपावली निमीत्त पत्रकार/संपादक यांचेकडून होत आहे. तसे अधिकृत पत्र जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून पत्रकार संघ लवकरचं करणार असल्याची माहिती आहे.