आज दिनांक २६/११/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार व आदरणीय श्रीमती समृध्दी एस भीष्म मॅडम, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपूर तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनानुसार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,चंद्रपूर व चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त श्री. लालजी जेम्स वकिलांचे "भारताचे संविधान " या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आदरणीय श्रीमती समृद्धी एस भीष्म मॅडम प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश चंद्रपूर यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन करून केली. सदर वेळी चंद्रपूर जिल्ह्यातील रजेवर असलेले न्यायाधीश हे ऑनलाइन पद्धतीने हजर होते व त्यांनी सुद्धा वरील प्रमाणे उद्देशिकेचे वाचन केले. सदर वेळी रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रमासाठी सर्व न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष श्री. अभय पाचपोर व इतर पदाधिकारी तसेच ज्येष्ठ वकील व न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुमित जोशी सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. आशिष धर्मपुरीवार सचिव जिल्हा वकील संघ चंद्रपूर यांनी केले.