राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने विदर्भातील पदाधिकाऱ्यांची एकदिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ (नाना) शेवते, महासचिव ज्ञानेश्वर सलगर,विदर्भ अध्यक्ष ॲड रमेश पिसे महासचिव संजय कन्नावार यांची उपस्थितीत राहणार आहे.या मेळाव्यात अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांचे पक्ष प्रवेश होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार असल्याने यावेळी रणनिती आखली जाणार आहे.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात येणार आहे.हा मेळावा तारा लाॅन,रेल्वे स्टेशन जवळ चंद्रपूर येथे दि.४ डिंसेंबर २०२२ रोजी सकाळी १२.०० वाजता होणार आहे तरी या मेळाव्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिनेश भोंगळे, मुन्ना मॅकलवार, संदीप कुळमेथे,गजानन पोहेकर, कुमार जुनमलवार, अशोक कोरेवार,नितेश मॅकलवार, बालाजी दुर्कीवार आदींनी केले आहे.