चंद्रपुर जिल्ह्यातील दुपारपेठ आणि ठानेवासना येथे 7.2 मिलियन टन इतके मोठे तांब्याचे साठे copper mine असून ह्या ठिकाणी वेदांता कंपनी दोन खाणी सुरू करण्याच्या तयारी त आहे.1/2/2019 मध्ये राज्यशासनाने हर्र।स करून वेदांता ला निमंत्रित केले आहे.पोंभुरणा pomburna तालुक्यातील ठानेवासना येथे 768.72 हेक्टर जागेवर तर दुपारपेठ येथे 816.29 हेक्टर जागेवर ह्या खाणी प्रस्तावित असून दोन्ही खाणी मिळून 7.2 मिलियन टन तांब्याचे साठे काढले जाण्याची शक्यता आहे.
अलीकडे चंद्रपुर मध्ये सोन्याच्या खाणी gold mine होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या.चंद्रपुर जिल्ह्यातील काही सर्वेक्षित क्षेत्रात क्वारट्झ वाहिन्यात अल्प प्रमाणात सोने आढळतात परंतु खाणी होण्या इतपत सोने चंद्रपुर जिल्ह्यात नाही,उलट नागपूर जिल्ह्यात पारसोनी, किटारी आणि मुरपार येथे सोन्याचे अल्प साठे आढळतात.
चंद्रपुर जिल्ह्यातील काही भागात मिनरल एक्सपोरेशन कॉर्पोरेशन ला चालको पाय राईट, पाय राईट, मॅग्नेटाइत,स्फिन, रुटाईल,डायमेणाईट, बोराईट, गोथाइट,क्रोमाइट,कोवेलाइट आणि ग्राफाईट सारखे मौल्यवान खनिजे सुद्धा आढळली.परंतु ह्यांपैकी तांबे मात्र मोठया प्रमाणात आढळले.
भारतीय भुवीज्ञान सर्वेक्षण (GSI) विभागाने 1971 -1979 वर्षाच्या काळात येथे सर्वेक्षण केले होते.2004 साली ह्यावर शासनाने सविस्तर अहवाल प्रकाशित करून खाण सुरू करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या होत्या.2019 मध्ये हर्र।स प्रक्रिया सुरू करून वेदांता ह्या कंपनी ला निमंत्रित केले होते.
पुढे ह्या कंपनी ला काम करायचे असेल तर वन, पर्यावरण आणि वन्यजीव विभागाचे मान्यता घ्यावी लागेल.
---------------
प्रा सुरेश चोपणे, चंद्रपुर