पुन्हा चंद्रपूर भुकंपाने हादरले



चंद्रपूर .16 जानेवारीला सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी भुकंप सदृश झटके चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी, लालपेठ, बाबू पेठ परिसरात काही सेकंद भूकंप सदृश्य हादरे जाणवली असून नागरिकात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.
१५ जानेवारीच्या घटनेची दखल घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी भूकंप सदृश्य घटनेची वस्तुस्थिती तपासून अहवाल मागवत,नेमकं काय घडलं? याबाबत चौकशीचे निर्देश दिले आहे.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरामध्ये दि.१५ जानेवारी २०२३ रोजी रात्रीच्या नऊ वाजून तीस मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने परिसरातील नागरिकात दहशत पसरली आहे. हा धक्का wcl च्या ब्लास्टिंग मध्ये झाला की भूकंपाचा आहे याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पुन्हा 16 जानेवारीला सायंकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी, लालपेठ, बाबू पेठ परिसरात काही सेकंद भूकंप सदृश्य हादरे जाणवली असून नागरिकात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे.
दोन दिवसातील भूकंपाच्या धक्क्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.