चंद्रपूर प्रीमियर लीग (सिपीएल) टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा शहरातील लाईफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केली जाते. यंदा स्पर्धेचे नववे पर्व आहे. स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळा मैदानावर या स्पर्धेसाठी सतत परिश्रम करून हिरवेगार मैदान खास तयार केले गेले आहे. सुमारे महिनाभरापूर्वी या स्पर्धेसाठी 350 क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. यानंतर रीतसर लिलाव प्रक्रियेद्वारे प्रत्येकी 15 खेळाडूंचा समावेश असलेल्या 16 संघाचे गठीत केले गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुभवी आणि नवोदित क्रिकेटपटूना या स्पर्धेद्वारे नैपुण्य दाखविण्याची संधी दिली जाते. गुरुवारी सकाळी 9.30 वाजता या क्रिकेट कार्निव्हलचा उत्साही प्रारंभ होत आहे.
उदघाटन सोहळ्याला जिल्हाधिकारी श्री.विनय गौडा, विभागीय वनाधिकारी श्री. प्रशांत खाडे, सेंट मायकेल शाळेचे प्राचार्य श्री. विकास कोल्हेकर यांची उपस्थिती राहणार आहे. गेली काही वर्षे अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सिपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असून यासाठी व्हीसीए दर्जाचे पंच, आणि इतर आवश्यक बाबीकडे विशेष लक्ष दिले जात आहे. उद्घाटनाचा पहिला सामना 'डायनॅमिक फायटर्स विरुद्ध व्हाईट एश' यांच्यात खेळला जाणार आहे. यानंतर दररोज 2 लीग सामने खेळविले जाणार आहेत. विजेत्या संघाला १ लाख २१ हजार रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार 29 जानेवारी 2023 रोजी खेळविला जाणार आहे. स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी ,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, आशीष अम्बाडे कार्यरत आहेत. नव्या आणि अनुभवी खेळाडूंना पाठींबा देण्यासाठी क्रिकेट रसिकांना मैदानात हजेरी लावण्याचे आवाहन करण्यात आले असून cricheroes या मोबाईल ऍपवर chandrapur premier league season 9 या सेगमेंट मध्ये या स्पर्धेची प्रत्येक अपडेट जाणून घेता येणार आहे.