नवरगाव - मध्य प्रदेश सरकारच्या Government of Madhya Pradeshसांस्कृतिक मंत्रालय अंतर्गत डिसेंबर 2021 ला एका राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये भटक्या विमुक्तांच्या पारंपरिक कला प्रकार या विषयात नवरगावच्या कुरमारी घोंगडीवर एक दीर्घ शोधनिबंध श्री ज्ञानेश महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख डॉ.गजानन कोर्तलवार यांनी सादर केला होता. त्यांच्या निबंधाच्या सादरीकरणानंतर लोकरंग 2022 मध्ये कुरमार समुदायाला निमंत्रित करण्यात आले होते.पण कोरोनाच्या निर्बंधामुळे तो उत्सव होऊ शकला नाही. यावर्षी मोठ्या थाटात आयोजित केलेल्या 38 व्या लोकरंग 2023 मध्ये नवरगावची घोंगडी भोपाळला पोहोचणार आहे.
झाडीपट्टीतील नाट्यपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरगावात आज कुरमार समुदायाचे 200 कुटुंब आहेत. मागील 300 वर्षापासून हा समुदाय झाडीपट्टी वास्तव्याला आहे.
तसे हा समुदाय मेंढपाळ करीत कर्नाटक पासून तेलंगणा मार्गे झाडीपट्टीत आलेला असावा. त्यांची कुरमारी बोली ही कन्नड तेलगू मिश्रित आहे. मेंढपाळ हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. सोबतच मेंढीच्या लोकर पासून कुरमारी महिला धागा तयार करतात.हा धागा नैसर्गिकपणे केला जातो.ही घोंगडी थंडीच्या दिवसात उष्ण आणि उन्हाळ्यात थंड असते म्हणून आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर मानली जाते. पारंपरिक दृष्टीने सुद्धा कुरमार समुदायाच्या लग्नात तिला महत्व आहे.
मध्यप्रदेश सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय विभागाच्या निमंत्रणावरून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साजरा होणाऱ्या लोक
उत्सव लोकरंग 2023 या भव्य सोहळ्यात भटक्या विमुक्त समाजाची जीवनशैली आणि पारंपरिक घोंगडी विनण्याची कला या अंतर्गत दि.26 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान प्रात्यक्षिक करून दाखवयाचे आहे.तिथे घरी बनवलेल्या त्यांच्या घोंगडी विक्रीस स्टॉल देण्यात आले आहे.या घोंगडीच्या प्रात्यक्षिकासाठी नवरगावच्या कुरमार समुदायातील
ऋषी दादाजी अल्लीवार यांच्या नेतृत्वात , सुकरू आसुजी सिंगिरवार अशोक ताड़ूजी मुद्रीवार,निर्मलाबाई अशोक मुद्रीवार, मीराबाई नीलकंठ इदुलवार, रोशन विठोबा परसवार हे समाज बांधव भोपाळसाठी रवाना झाले आहे.