राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे यांचे अध्यक्षतेत गुरुवार दिनांक ०२फेब्रूवारी २०२३ रोजी सकाळी ११: ०० वा.. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह , धनगर नगर , गजानन महाराज मंदिरामागे शेगाव Punyashlok Ahilyabai Holkar Auditorium, Dhangar Nagar, Shegaon behind Gajanan Maharaj Temple येथे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती , वाशिम, यवतमाल जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्याची आढावा बैठक अयोजित केली आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक बुलडाणा जिल्ह्याचे रासप नेते शिवदास सोनवने यानी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षात नव्याने जाहीर पक्ष प्रवेश घेऊन सक्रीय राजकारणात सहभागी होऊ इच्छीनारे कार्यकर्त्याना पक्ष प्रवेश देवुन पद्नियुक्ति करण्यात येणार आहे. तसेच विदर्भातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीची
रणनीती ठरवून पक्ष बाधनी मजबूत करण्यात येणार असुन जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, जिल्हा परिषद सर्कल, पंचायत समिती सर्कल, गांव तिथे शाखा, एक बूथ पाच युथ," हर हर महादेव ! घर घर महादेव !! हर घर संविधान !!!"हे आभियान प्रभाविपने राबविन्यात येणार आहे.
या बैठकीला मार्गदर्शन करण्याकारीता राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्य्क्ष प्रा एड रमेश पिसे, विदर्भ संपर्क प्रमुख कृषि सम्राट राजेंद्र पाटील , विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार, विदर्भ उपाध्यक्ष स्वरूप रामटेके, विदर्भ कोषाध्यक्ष पुरुषोत्तम कामड़ी, नागपुर शहर सचिव सुनील शेंडे, बुलढाना जिल्हा अध्य्क्ष अमोल काकड़, बुलढाना जिल्हा संपर्क प्रमुख अतुल भुसारी , अमरावती जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रदीप पाथुरडे, यवतमाल जिल्हा अध्यक्ष. संजय दिवसे वसंता कोडपे , वाशिम जिल्हा अध्यक्ष दीपक तिरके, अकोला जिल्हा अध्यक्ष मंगल जाधव व जिल्हा महासचिव आशीष कोल्हे, तसेच युवा नेते सागर समुद्रवार आदि मान्यवर उपस्थित राहणार अहेत .
या बैठकीला रासप कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. एड. रमेश पिसे यानी केले आहे,.