अन् त्या दारु दुकानदाराने चक्क ग्राहकांच्या डोक्यावर फोडली बाटल And the liquor shopkeeper broke the bottle on the head of the customer




चंद्रपूर येथिल जटपुरा गेट जवळ अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या आनंद वाइन शॉपचे संचालक संदीप अडवाणी यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी चक्क ग्राहकांच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून ग्राहकाला गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून दुकानाचे संचालक संदिप अडवाणी ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्राप्त माहितीनुसार शहरातील जटपुरालगत असलेल्या आनंद वाइन शॉपचे मालक चंद्रकांत अडवाणी यांचा मुलगा संदीप अडवाणीने रेल्वे स्थानकावर माथाडी कामगार म्हणून कार्यरत 32 वर्षीय दिलीप नरवाडे ह्यांच्या डोक्यावर शुल्लक वादातून दारूची बाटली फोडून त्याला गंभीर जखमी केले.


दिलीप नरवाडे हा आपले काम संपवून 14 मार्चच्या सायंकाळी दारू खरेदी करण्याकरिता आनंद वाईन्स येथे गेला. त्या ठिकाणी काही वाद निर्माण झाल्याने संतापलेल्या संदिप अडवाणी ह्यांनी चक्क दारूच्या मोठ्या बाटलीने हल्ला करून डोक्यावर बाटली फोडली. झालेल्या प्रकारामुळे उपस्थित सर्व ग्राहक भांबावून गेले. इकडे प्राणघातक हल्ला झालेला दिलीप नरवाडे रक्तबंबाळ स्थितीत खाली कोसळला. अखेरीस इतर ग्राहकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

कुटुंबीयांना माहिती कळताच जलनगर येथुन रुग्णालयात पोहचले. त्यांनतर त्यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखुन पोलिसांनी आरोपी संदिप अडवाणी ह्यांच्या विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्ह्याची नोंद करून अटक केली असुन पुढील तपास सुरू आहे.