चंद्रपूर : जाती- धर्मभेद न करता गावाच्या विकासासाठी कसे पुढे नेता येईल यासाठी जेंव्हा जेंव्हा प्रयत्न कराल, तेव्हा तेव्हा मी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी,व त्यांचे शेतमाल बाजारापर्यत जाण्यासाठी पांदण रस्त्यांची निर्मीती करण्याचा संकल्प केल्याची घोषणा वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
प्रतीकार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुनासुर्ला च्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, माजी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे,माजी नगराध्यक्ष हरीश शर्मा , संस्थेचे अध्यक्ष सुरेश जिल्हेवार, माजी सभापती चंदू मारगोनवार, सरपंच रणजीत समर्थ,वासुदेव समर्थ, संजय येनूरकर, प्रभाकर भोयर, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री मुनगंटीवार पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये थेट जमा करण्याचा निर्णय केला रित्या सरकार सुध्दा केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारसुध्दा ६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आता १२ हजार रुपये जमा होतील. धानाला हेक्टरी १५ हजार रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून यात कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. मुल तालुक्यातील जुनासूर्ला गावात अनेक विकासाची कामे करण्यात आले असून पुन्हा जेजे समाज हीताचे काम बाकी आहेत ते काम पुर्णत्वास नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतीपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतीकार नागरी सहकारी पतसंस्थेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. प्रतीकार नागरी सहकारी पतसंस्था ही संस्था मुंबई सारख्या ठिकाणी पोहचेल, महाराष्ट्राला गर्वाने मान उंचावून सांगू,अशी आशा व्यक्त केली. ना.सुधिर मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री यांचे "भगीरथ " पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचे "जननायक" पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.