मुल तालुक्यातील जुनासूर्ला येथे आज महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्राम पंचायतीच्या सरपंच सचिव यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कर्मचारी गणपत डोमाजी भोयर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
गणपत भोयर यांचे सेवानिवृत्त कार्यकाळ अवघ्या काही दिवसांवर असून त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्याचा संकल्प ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी घेतला होता.त्यानुसार भोयर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत सरपंच रणजीत समर्थ, उपसरपंच खुशाल टेकाम, सचिव अ.आ. गौरकार व ग्रामपंचायत कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते. ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला उपक्रम हा इतर ग्रामपंचायतीना प्रेरणा देणारी ग्राम पंचायत ठरली असल्याचं मत पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.