त्या तरूणीवर होणारा वार झेलणाऱ्या लेशपालचे रासपने स्विकारले पालकत्व Rasap accepted the guardianship of Leshpal who suffered the blow on that girl




पुणे : पुण्यातील कोयता हल्ला Koyta attack in Pune प्रकरणानंतर लेशपाल जवळगे Near Leshpalचांगलाच चर्चेत आला आहे. लेशपाल याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीही लेशपाल याचं कौतुक केलं आहे. जीव धोक्यात घालून लेशपालने कोयता हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवला. त्यामुळे त्याच्यावर हा कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर राष्ट्रीय समाज पक्षाने National Social Partyचक्क लेशपालचं पालकत्व घेतलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही लेशपालचं पालकत्व घ्यावं, असं आवाहन या राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेवराव जानकर Mahadevrao Jankarयांनी केलं आहे.




कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने लेशपाल जवळगे याच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते लेशपाल जवळगे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महादेव जानकर यांनी लेशपाल जवळगे याच्या धाडसाचं कौतुक करून त्यानं यूपीएससीत यश मिळवावे अशी आशा व्यक्त केली.




यशपालने यूपीएससी पास करून आयएएस किंवा आयपीएस व्हावं, अशी आशा व्यक्त करतानाच आम्ही लेशपाल याचं पालकत्व स्वीकारत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील लेशपाल जवळगे याचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं.

पाच लाखाचं बक्षीस जाहीर

दरम्यान, कोयता हल्ल्यातून तरुणीचा जीव वाचवल्याच्या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. शिंदे यांनी या हल्ल्यातून तरुणीला वाचवणाऱ्या दोन्ही तरुणांना प्रत्येकी पाच लाखांचे बक्षिस जाहीर केले आहे. येत्या एक ते दोन दिवसात या तरुणांना बक्षिस दिलं जाणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाच्या प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सांगितलं. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

काय घडलं?

पुण्यात एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा एका तरुणाने प्रयत्न केला होता. हा तरुण कोयता घेऊन या तरुणीच्या मागे धावत होता. आजूबाजूला लोक होते. पण कुणीही तिच्या मदतीला धावले नाही. पण लेशपाल जवळगे या तरुणाने जीवाची पर्वा न करता धाडस दाखवत या तरुणीचा जीव वाचवला.

तसेच कोयता घेऊन तरुणीवर वार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला पोलिसांच्या हवाली केले होते. त्यामुळे लेशपाल यांचं कौतुक होत होतं. मात्र, दुसऱ्या बाजूने दिवसाढवळ्या पुण्यात तरुणीवर हल्ला होण्याच्या घटनेने पुणेकर हादरून गेले आहेत. आधीच दर्शना पवार हिच्या हत्याकांडाने पुणे हादरलेले असतानाच हा दुसरा प्रकार होता होता वाचला. त्यामुळे पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.