चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कोळसा वहन करणाऱ्या पाईपचे बेल्ट तुटल्याने शेकडो कामगारांना थायसन व पेटी कंत्राटदार भावना एनर्जी प्रा.कंपनीने त्या कामगारांना कामावरून काढून टाकल्याने कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे त्यामुळे कन्हवर्टर बेल्ट त्वरीत सुरू करून कामगारांना कामावर घेण्यात यावे यासाठी डॉ पी.अनबलगन अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक मुंबई,मा.श्री .संजय मारुडकर संचालक (संचलन) श्री.एकनाथ एस मोजे संचालक तथा मुख्य अभियंता (कार्य),गुप्ता साहेब मुख्य अभियंता ,वाजुरकर साहेब cro यांना प्रत्यक्ष भेटून कामगारांच्या समस्या श्री चिखलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेचे चंद्रपूर जिल्हा सचिव अमोल मेश्राम, वासीक शेख जिल्हाप्रमुख अमरावती यांनी मांडले.
कोळसा हाताळणी विभाग अंतर्गत येत असलेल्या कन्हवर्टर बेल्टचे कंत्राट थायसन इडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना कंत्राट मिळाले थायसन कंपनीने भावना एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनाला पेटी कंत्राट तत्वावर काम दिले. कन्हवर्टर बेल्ट तुटल्याने दिनांक १६ मार्च २०२३ पासून या सर्व कामगारांना कोणतीही पूर्व सुचना न देता सुरू असलेल्या कामावरून अचानक बंद केले आहे.चंद्रपूर थर्मल पॉवर कंपनीने अजून ही कामासंबधीत वर्क ऑर्डर न काढल्याने कामगारांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आलेली आहे.त्यामुळे त्वरित कामाचे आर्डर काढावे अशी मागणी मुंबई येथील प्रकाशगड येथील विज निर्मिती अध्यक्ष, संचालक,यांची भेट घेऊन कामगारांच्या समस्या मांडण्यात आले.
यावेळी संचालकांनी येत्या १० दिवसांत प्रकरण निकाली काढण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या नेतृत्वात शाखा अध्यक्ष प्रफुल्ल सागोरे सचिव प्रमोद कोलारकर व कामगारांचे प्रतीनिधी उपस्थित होते.