अमरावती :- राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार माजी मंत्री राष्र्ट्नायक महादेवराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ (नाना) शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा.रमेश पिसे आदेशानुसार अमरावती विभागात पक्ष वाढीच्या दृष्टीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ तौसिफ शेख यांनी अमरावती जिल्हाध्यक्ष पदावर किरण होले यांची तर गणेश मानकर यांची अकोला जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे.त्याच्या नियुक्तीने पक्ष वाढीसाठी मदत होईल पक्ष जोमाने वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहेत.