मुंबई : चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश आहे. तर चंद्रावर मोहीम फत्ते करणारा भारत चौथा देश ठरला आहे. चंद्राच्या अभ्यास करण्यास यामुळे मोलाची मदत होणार आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे. 40 दिवसांचा प्रवास करत चंद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं आहे. आता चंद्रावरील पुढच्या अभ्यास
सुरु होणार आहे. चंद्रावर दिवस आणि रात्रीचा कालावधी 14 दिवसांचा आहे. म्हणजेच 14 दिवसानंतर रात्र येते. 23 ऑगस्टला सूर्योदय होणार असल्यानेच हा दिवस निवडला गेला होता. दक्षिण ध्रुवावर आता 14 दिवस सूर्यप्रकाश असणार आहे. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत दक्षिण ध्रुवावर प्रखर ऊन असणार आहे. त्यामुळे लँडरवरील सोलार पॅनेलला मदत होणार आहे. चंद्रयान रोव्हर चार्ज होईल आणि आपलं मिशन पूर्ण करण्यास मदत होईल