My chandrapur ग्रुप | लिमेश जंगमवर खंडणीचा गुन्हा दाखल | Filed an extortion case against Limesh Jungamof My Chandrapur Group




सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहणाऱ्या लिमेश जंगमLimesh jungam यांचेवर खंडणी वसूल करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने हा विषय महानगरात चर्चेचा ठरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दिनांक 9 ऑगस्ट, 2023 रोजी ट्रॉन्सपोर्ट व्यवसायीक फिर्यादी नामे सुरज अरविंद ठाकरे हयांनी लिमेशकुमार जंगम यांचे विरोधात तक्रार दिली.
सूरज ठाकरे हे कामगार संघटनेच्या माध्यमातुन समाजकार्य करीत असुन दरम्यान त्यांची सोशल मिडीयावरुन लिमेश कुमार जंगम रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर यांचेशी ओळख झाली. माहे जानेवारी 2023 मध्ये लिमेशकुमार जंगम यांनी फिर्यादीकडुन आर्थिक मदत म्हणुन पैसे स्विकारले होते. त्यानंतर त्याने ठाकरे कडुन वारंवार पैशाची मागणी केली.ठाकरेंनी आर्थीक अडचण असल्याचे सांगितल्यावर सुध्दा लिमेशकुमार जंगम हा सोशल मीडिया वरील सक्रीयतेचा फायदा घेवुन "तु जर मला पैसे दिले नाही, तर तुला कामगार संघटनेत बदनाम करुन तुझी राजकीय कारकिर्द संपुष्टात आणतो व नुकसान पोहचवितो, तसेच सोशल मिडीयावर तुझी बदनामी करतो," अशी भिती घालुन धमकी दिली व खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देवुन फिर्यादीकडुन गुगल-पे व नगदी स्वरुपात खंडणी घेतली.असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. लिमेशकुमार जंगम याने सोशल मिडीयावर बदनाम करण्याची धमकी देवुन ठाकरे कडुन एकुण 35000 /- रुपये खंडणी वसुल केले.ठाकरे यांच्या रिपोर्टवरुन पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे डिजिटल मीडिया एक्सपोज,चंद्रपूर व कबीराचे संचालक लिमेश कुमार जंगम याचे विरुध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हयाचा सखोल तपास सहायक पोलीस निरीक्षक रमीझ मुलानी करीत आहेत.

पोलिसांचे नागरीकांना आवाहन

लिमेशकुमार जंगम यांनी कोणही नागरीकांकडून खंडणी वसुल केली असेल किंवा इतर काही तक्रार असेल तर त्याबाबत नागरीकांनी न घाबरता पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे तक्रार नोंदवावी.असे आवाहन प्रसिद्धी पत्रकातून पोलिसांनी दिली आहे.