चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन Chandrapur Thermal Power Station हे राज्याला उर्जा देणारी असून जगात प्रदुषणात अव्वल स्थानावर असलेल्या सिटीपिएस वसाहतीत आज विजेचा लपंडाव सुरू होता.त्यामुळे राज्याला विज पुरवठा करणाऱ्या सिटीपीएसच्या कर्मचाऱ्यांना विजेची झळ सोसावी लागली. वसाहतीत आज अचानक झालेल्या लोडशेडींग मुळे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना खुप मोठे त्रास सहन करावे लागले.काही वसाहतीतील कर्मचाऱ्यांना विचारले असता हा नेहमीचाच त्रास असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन हे राज्याला सर्वात जास्त विज पुरवठा करते.राज्याची राजधानी मुंबईला सुध्दा अखंडीत विज पुरवठा केल्या जाते. मात्र चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील वसाहतीत विजेच्या खंडित पुरवठ्यामुळे वसाहतीतील कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.