शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता मुख्याध्यापकांचे एकला चलो रे The school management committee is not trusted by the principals



मुल :- जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा जुनासुर्ला Zilla Parishad Higher Primary School Junasurla येथील मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समीतीला विश्वासात न घेता स्वमर्जीने शाळेतील सर्व कामे करीत असून मुख्याध्यापकावर कार्यवाही करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समीतीने संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल Cadre Development Officer Panchayat Samiti Childयांचेकडे तक्रार करण्यात आली आहे.

नुकताच शाळेतील विध्यार्थी - विध्यार्थीनीचे शालेय गणवेश घेतांना मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात घेतलेले नाही. किंवा साधी विचारपुस सुद्धा केलेली नाही. आपल्याच मर्जीने च मनाने शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश घेतलेला आहे.
शाळेची इमारत दिनांक २८/०६/२०२३ रोजी विवाहाकरीता देतांना मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता आपल्याच मर्जीने निर्णय घेवून शाळेची इमारत दिली, त्यांच्या एकला चलो रे च्या भुमिकेबाबत शाळा व्यवस्थान समिती सदस्यांनी मुख्याध्यापक श्री. वाळके यांना विचारणा केली असता मी शाळा व्यवस्थापन समितीला कचऱ्याची किंमत देत नसुन तुमच्याने जे बनते ते करा, माझी तक्रार करा, किंवा माझ्या विरुध्द आंदोलन करा किंवा मा.जिल्हाधिकारी साहेब यांचे कडे जा किंवा मंत्र्याकडे जा, मी कुणालाही घाबरत नाही. व माझे कुणीही काही वाकडे करू शकत नाही. शाळा व्यवस्थापन समिती माझ्या समोर काडीकचरा आहे. असे उध्दट उत्तर समीती सदस्याना दिले.त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीतीत संभ्रम निर्माण झाला आहे.

श्री.बाळके मुख्याध्यापक यांचे मनमानी कारभार व हेकेखोर स्वभावामुळे शाळा व्यवस्थापन समितीला कोणतीही किंमत राहीलेली नसून फक्त कागदोपत्री समिती अस्तित्वात असल्याचे दिसुन येते. शाळा व्यवस्थापन समिती ही शासनाचे धोरणानुसार स्थापन झालेली असून शासनाचा यामागे उच्च हेतु होता व पालक वर्ग शाळा प्रशासन व शाळा समिती मध्ये समन्वय राहावा, योग्य निर्णय घेतले जाये, व शाळेचे प्रशासन योग्य राहावे हा उद्देश असल्याने शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येते पण श्री. वाळके यांनी शासनाचे धोरणालाच काळीमा फासला आहे.

स्वमर्जीने शाळेतील गणवेश व इतर केलेल्या कामाची चौकशी करून मुख्याध्यापक यांचेवर योग्य ती कारवाही करावी व शाळा व्यवस्थापन समिती जुनाला यांना न्याय प्रदान करण्यात यावा असे शाळा व्यवस्थापन समितीने तक्रारीत नमूद केले आहे.