प्रभु श्रीरामचंद्र यांचे संपूर्ण जीवन चरित्र रामायण या ग्रंथातून जगापुढे मांडणारे थोर संत वाल्मीक ऋषी हे महान संत होते. त्यांनी त्या काळात साक्षर होऊन रामायण हा इतिहासातील अजरामर ग्रंथ रचला. त्यांच्याच विचाराने प्रेरित होऊन वाल्मीक समाजाने जगापुढे आदर्श निर्माण करावा असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सावली तालुक्यातील सामदा येथे वाल्मीक ऋषी जयंती महोत्सव निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राज्याची विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, माजी जिल्हा परिषद सभापती दिनेश चिटनुवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भांडेकर, सावली काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष नितीन गोहने, प्रदीप गद्देवार, व मंचावर वाल्मीक रुषी जयंती महोत्सव समिती चे पदाधिकारी, इतर मान्यवर तथा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, वाल्मीक समाजा अतिशय कष्टाळू , मेहनती व प्रामाणिक समाज आहे. वाल्मीक समाजातील थोर संत वाल्मीक ऋषी यांनी सर्वप्रथम साक्षर होऊन प्रभू श्री रामचंद्र जी गाथा रामायण रचली व संपूर्ण जगाला याची महती कळाली. विकास आघाडी सरकारच्या काळात वाल्मीक समाजाला न्याय देण्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना ही विशेष योजना कार्यान्वित करून भोई समाज बांधवांना हक्काचे घरकुल मिळावे याकरिता मतदार संघातील तीनही तालुक्यात एकूण 2700 घरकुल मंजूर केले. तसेच मतदार संघातील तसेच संपूर्ण जिल्ह्यातील व राज्यातील नागरिकांना कर्करोग या महाभयंकर प्राण घातक रोगांपासून वाचविण्याकरिता 2.5 कोटी रुपये खर्च करून अद्यावत कर्करोग निदान फिरते दवाखाना वाहन लोकांच्या सेवेत आणून राज्यातील पहिला प्रयोगही केला. व यातून आजवर तीनशे लोकांचे कर्करोगाचे प्राथमिक निदान करून त्यांचे प्राण वाचविण्यात यश मिळविले. भोई समाजाने वाल्मीक ऋषींचा आदर्श घेऊन साक्षर होऊन समाजाची प्रगती साधावी असेही ते यावेळी म्हणाले. समदा येथील वाल्मीक समाजातर्फे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा नागरी सत्कार करण्यात आलाआयोजित कार्यक्रमास वाल्मीक समाजाचे पदाधिकारी गावकरी व काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्ते शेकडांच्या संख्येने उपस्थित होते.