गडचिरोली - पोलीस शिपाई पद भरती मधील भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी व इतर मागणिकरिता पोलीस अधीक्षक,जात पडताळणी समिती, राज्य राखीव पोलीस बल विभागातील विषयावर धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात पोलीस भरतीतील अन्यायग्रस्त उमेदवार 10 ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी घेतली उपोषणाची दखल
त्याची दखल माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी शिष्टमंडळाला भेट दिली.त्यावेळी सर्व आपबीती समजून घेतल्यानंतर अधिकाऱ्यांवर चांगले संतापले.उपमुख्यमंत्री मान. फडणवीस साहेब, मंत्री अतुल सावे साहेब, गडचिरोली चे जिल्हाधिकारी मीणा साहेब, जात पड़ताळनी विभागाचे अधिकारी यांचेसोबत फ़ोनवरून चर्चा करुन त्वरित झाडे कुनबी समाजाची घूसखोरी थांबवून उपोषणक्रत्या मुलांना न्याय देण्यात यावा असे सख्त निर्देश अधिकारयांना दिले.यावेळी अधिकाऱ्यांनी झाडे कुणबी हे बोगसपणे घुसखोरी केली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाला देण्यात आले. यावेळी धनगर समाज संघर्ष समितिचे नागपुर विभाग अध्यक्ष डॉ तुषार मरलावार, नितेश म्याकलवार, राजु कंचावार, विनोद नेरडवार व समाजाचे कार्यकरते उपस्थित होते
गडचिरोली जिल्ह्यात झाडें कुणबी या जातीतील कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक 15 वरील झाडें या पोटजातीचा आधार घेऊन नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील असल्याचे दाखवून खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीमध्ये नियुक्त झालेले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरती 2021 व सन 2022 मध्ये 13 बोगस झाडे उमेदवारांची निवड झाली तर राज्य राखीव पोलीस भरती 2022 मध्ये 5 बोगस उमेदवारांची निवड झाली त्यामुळे खऱ्या भटक्या जमाती क प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय झालेला आहे.गडचिरोली पोलीस भरती 2021मध्ये नियुक्त झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडें उमेदवारांनी सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना बडतर्फ करण्यात यावे, गडचिरोली पोलीस भरती 2022 मध्ये निवड झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवार ज्यांची जात वैधता रद्द झालेली आहे त्यांचेवर गुन्हे दाखल करून निवड रद्द करण्यात यावी.
भटक्या जमाती (क) मधील बोगस झाडें उमेदवारांचे जात पडताळणी समिती गडचिरोली यांनी तात्काळ जात वैद्य/अवैद्य ठरवावे, गडचिरोली पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील खऱ्या भटक्या जमाती (क) उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, राज्य राखीव पोलीस भरती काटोल येथील बोगस झाडें उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे.
या मागण्या घेऊन धनगर समाज संघर्ष समितीच्या नेतृत्वात
अन्यायग्रस्त पोलीस भरती उमेदवार बेमुदत उपोषणाला बसले आहेत.त्यातील गणेश देवेवार या उपोषण कर्त्याची तब्बेत खालावली असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले आहे