सोमय्या पॉलीटेक्नीक येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती औचित्य साधून स्वछता अभियान Swachhata Abhiyan on the occasion of Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti at Somaiya Polytechnic




  महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या पॉलीटेक्नीक कॉलेज वडगाव येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे संस्थापक  श्री. पी. एस. आंबटकर, सचिव सौ.प्रीती पांडुरंगजी आंबटकर ,उपाध्यक्ष श्री. पियुष आंबटकर, डायरेक्टर सौ. अंकिता पियुष आंबटकर, प्राचार्य श्री.जमीर शेख सर, प्राचार्य श्री. मस्के सर,प्रा.खुजे सर रजिस्टर श्री.बिसेन सर यांची उपस्थिती होती.


                                       सर्व प्रथम महात्मा गांधी व  लालबहादूर शास्त्रीं यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केले, यावेळी  प्राचार्य श्री.जमीर शेख यांनी समयोचित मार्गदर्शन केले,तसेच मान्यवराने भाषण देत जगाला सत्याग्रहाबरोबर अहिंसेचे तत्वज्ञान शिकविणाऱ्या गांधीजींचा जन्मदिवस जगभरात आंतराष्ट्रीय अहिंसा दिन मानून साजरा केला जातो.अहिंसेच्या तत्वावर सत्यग्रहाचा उपयोग गांधीजींनी सर्वप्रथम भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला.
 

                                  अहिंसेचा तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी "दांडी यात्रा ","भारत छोडो आंदोलन" ,"चले जाओ","मिठाचा सत्याग्रह ",अशा अनेक चळवळी तसेच सत्य आणि अहिंसा या तत्वावर आधारित आंदोलनात ब्रिटिश सरकारला धारेवर आणले,गांधीजींनी सदयव स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कंपन्यांचा विरोध करीत खादीचा पुरस्कार केला. 
  

                                तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीं याचा जन्म दिवस साजरा केला,"जय जवान,जय किसान "चा गुरु मंत्र दिला,देशाचा आधार स्तंभ शेतकरी व सैनिक याना विशेष महत्व दिले असे प्राचार्य श्री.जमीर शेख यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले.
                              या कार्यक्रमाला सर्व विभाग प्रमुख आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्तित होते .