- राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या दौऱ्यामुळे भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे. जानकर यांनी भाजपाची साथ सोडल्यानंतर भाजपामध्ये धुसफूस निर्माण झाली आहे.
जानकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश या ठिकाणी जनस्वराज्य यात्रा काढून लोकांमध्ये भाजप-काँग्रेस सरकारचे वाईट कारभार समजून सांगण्यात यशस्वी ठरल्यानंतर आता विदर्भात जनस्वराज्य यात्रेची औपचारिक झलक दाखविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील शेतकरी सदन येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याने भाजप-काँग्रेस मध्ये विदर्भाच्या राजकारणात थंडीमध्ये गर्मी निर्माण झाली आहे.
जानकर आपल्या भाजप स्थित जागेवर हक्क निर्माण करीत असल्याने भाजप भयभीत झाले आहे. जानकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा,खाणदेश या ठिकाणी जनस्वराज्य यात्रा काढून लोकांमध्ये भाजप काँग्रेस कसे धोकादायक आहेत.
हे समजून सांगण्यात यशस्वी ठरल्यानंतर आता विदर्भात जनस्वराज्य यात्रेची औपचारिक झलक दाखविण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर येथील शेतकरी सदन येथे भव्य मेळावा आयोजित करण्यात आल्याने भाजप काँग्रेस मध्ये विदर्भाच्या राजकारणात थंडीमध्ये गर्मी निर्माण झाली आहे.
विदर्भ अध्यक्ष प्रा.रमेश पिसे,विदर्भ मुख्य महासचिव संजय कन्नावार अमरावती विभागाच्या प्रमुख डॉ तौसीफ शेख यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्हा अध्यक्ष किरण पाटील होले पुढाकाराने गुरूवार दिनांक २३/११/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
जानकर यांच्या जनस्वराज्य यात्रेमुळे विदर्भातील राजकारणात नवीन उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या यात्रेमुळे भाजपा-काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो आणि जानकरांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षाला विदर्भात मोठी ताकद मिळू शकते.
या मेळाव्याला जानकर यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
या मेळाव्यानंतर विदर्भात जनस्वराज्य यात्रेची सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे विदर्भाच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. सर्व राजकीय पक्षांचे लक्ष याकडे लागले आहेत.