चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन हे भारतात दुसऱ्या क्रमांकावर तर महाराष्ट्रात सर्वात मोठी विज निर्मिती क्षेत्र असून या कार्यालयामध्ये अनेक कामानिमीत्त दुरवरून लोक येत असतात मात्र चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चे मुख्य अभियंता यांनी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना फोन करूनच आतमध्ये प्रवेश घेण्याचे तोंडी आदेश काढले आहे
त्यामुळे कामानिमीत्त आलेल्यांना आता गेटच्या बाहेरुनच परतीचा प्रवास करावा लागत आहे.
एकीकडे चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले असतांना त्यावर कोणतीही ठोस पावले उचलली जात नाही त्यावर कुठलेही नियम मुख्य अभियंता बनवित नाही मात्र कामासाठी येणाऱ्या अभ्यागतासांठी अनोखा नियम मुख्य अभियंता काढल्याने सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अभ्यागत नाहीच परंतु कंत्राटदार कामगार यांच्याकडे कामाचे गेट पास आहे त्यासुद्धा रांगेत उभे राहून ज्यांचेकडे काम आहे त्यांना फोन करूनच आत प्रवेश करता येणार आहे.काही अधिकारी कर्मचारी फोन केल्यानंतरही फोन उचलत नाही.अश्यावेळी अभ्यागतांना परतीच्या मार्गावर जावे लागते.याबाबत मुख्य अभियंता श्री कुमरवार यांना विचारणा केली असता त्यांनी सुध्दा आपला निर्णय योग्यच असल्याचे सुतोवाच केले आहे.पत्रकार, लोकप्रतिनिधी यांना सुध्दा रांगेत उभे राहून संबंधीत अधिकाऱ्यांना फोन करूनच प्रवेश मिळणार आहे.फोन केल्यानंतरही सुरक्षा रक्षक ऐकायला तयार नाही.यापुर्वी उर्जाभवनमध्ये भ्रमणध्वनी नेण्यास मनाई करण्यात आली होती.त्यांनतर काही प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रकाशित केल्यानंतर भ्रमणध्वनी मनाई हटविण्यात आता अभ्यागतांना कार्यालयात येण्यास बंदी केल्याने मुय अभियंत्यांच्या अजब आदेशावर अभ्यागतांना तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.