ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांचा राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश



चंद्रपूर :- जिल्ह्यातील पोभुर्णा तालुक्यातील देवाडा (खुर्द) येथील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितेश मरठे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी विदर्भ प्रदेश मुख्य महासचिव संजय कन्नावार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश घेतला.



राष्र्ट्रनायक राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रदेशाध्यक्ष काशीनाथ (नाना) शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर (माऊली) सलगर, विदर्भ अध्यक्ष प्रा.रमेश पिसे, विदर्भ महासचिव संजय कन्नावार,विदर्भ उपाध्यक्ष डॉ तौसीफ शेख यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाचे बुथनिहाय पक्ष बांधणी सुरू आहे.



त्यानुसार मुख्य महासचिव संजय कन्नावार,जिल्हाध्यक्ष रमाकांत यादव, वाहतूक आघाडी महासचिव अनुप यादव यांच्या उपस्थितीत पोभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्य नितेश मरठे यांच्यासह भूषण भुगूस्कर, सूरज मडरे, पुरुषोत्तम रावत, विवेक शिंदे, मुक्तेश्वर भुगूस्कर, अजय शास्त्र, रूचित गद्देकर, अविनाश गद्देकर, निखिल भुगूस्कर, करण हास्य, ऋतिक घोडेवाल, सचिन शिंदे, दीपक राऊत, आशीष शिंदे, प्रशांत कामपेल्लीवार आदींनी प्रवेश घेतला या प्रवेशामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रीय समाज पक्षाला बळकटी मिळणार आहे.