नागपुरातील सोलारएक्सप्लोरी कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. रविवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारात झालेल्या स्फोटमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत दारूगोळा बनवण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
नागपुरातील सोलर एक्सप्लोरी कंपनी संरक्षण क्षेत्राला लागणारा दारुगोळा निर्मितीचे काम करते. नागपूरमधील बाजारगाव या गावात ही कंपनी आहे. कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लँन्टमध्ये पॅकिंगचे काम सुरु होते. त्यावेळी अचानक स्फोट झाला. रविवारी सकाळी नऊ वाजता झालेल्या या स्फोटामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. या कंपनीत संरक्षण क्षेत्राशी संबंधित दारूगोळा निर्मितीचे काम सुरु असते. त्यात मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर होत असतो. या केमिकलमुळे हा स्फोट झाला असल्याची शक्यता आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.