चंद्रपूर (वि.प्रति.)
लोकप्रतिनिधींच्या पि.ए. चे बेताल वागण्याचा अनुभव अनेकदा जनसामान्यांना येत असतो. लोकप्रतिनिधींपेक्षा यांचाचं तोरा मोठा असल्याचे अनेक ठिकाणी बघायला मिळते. कधी-कधीचं यांच्या तक्रारी लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचतात. अन्यथा लोकप्रतिनिधींचा पि.ए. आहे म्हणून अनेक जण गप्प रहातात परंतु अशा घटनांचा प्रभाव त्या-त्या लोकप्रतिनिधींसाठी धोक्याची घंटा ही होवू शकते. "चहा पेक्षा केटली गरम" अशी आज जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी च्या पि.ए. ची स्थिती आहे. अश्याच एका पि.ए. च्या संतापजनक कारनाम्याची चर्चा सध्या जिल्ह्यात मोठ्या चवीने चर्चिली जात आहे.
जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधी कडे खाजगी मदतनीस (पीए) असलेल्या तथाकथित पत्रकाराचे चोचले-कारनामे वाढल्याने लालबुंद झालेल्या लोकप्रतिनिधीने संतापून त्या पि.ए.ला तोल सोडून खडसावल्याने त्या पि.ए.ची नशेची झुंगी पार उतरवली असल्याची चर्चा आहे. या नशेडी पि.ए.नी ज्या लोकप्रतिनिधीकडे कार्यरत आहे, त्यांचाच पक्षातील आपल्या आईच्या वयाच्या वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्याच्या व्हाट्सअपवर रात्रो "निमंत्रण" देणारा मेसेज करून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या वरिष्ठ महिला पदाधिकाऱ्याला ही बाब जिव्हारी लागल्याने त्यांनी घडलेल्या प्रकाराचा इतिवृत्तांत लोकप्रतिनिधी कडे कथन केला.
घडलेल्या संतापजनक प्रकारामुळे लालभडक झालेल्या लोकप्रतिनिधीनी "त्या" पि.ए.ची संपुर्ण पि.ए. गिरी उतरविली. "आली नवतरी फुगले गाल ! गेली नवतरी जिवाचे हाल !!" अशी स्थिती आज या नशेडी पि.ए. ची झाली आहे. या पी.ए.चे एक नव्हे तर अनेक झोल-झाल प्रकरणे समोर येत असून लोकप्रतिनिधी त्या पि.ए. चा चांगलाच समाचार ते तत्पर लोकप्रतिनिधी घेणार असल्याचे कळते.
आज बहुतेक लोकप्रतिनिधींकडे पत्रकारांच्या वशिल्याने पत्रकारिता क्षेत्रातीलचं महानुभाव पि.ए. म्हणून कार्यरत आहेत. असल्या गलिच्छ प्रकारामुळे आपल्या क्षेत्रासोबत लोकप्रतिनिधींची प्रतिमा ही डावलत असते याचे भान लोकप्रतिनीधींच्या पी.ए. नी ठेवायला हवे व लोकप्रतिनिधींनीही त्यांचेकडे कार्यरत असणारे कर्मचारी त्यांचे कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत की नाही याकडे विशेष करून लक्ष ठेवायला हवे असेच यानिमित्त सांगावेसे वाटते.