अनेक अवैध व्यवसायांसोबत हनीफ (लक्की )चे मधूसंबंध आहे.लक्कीनी भेसळ तेलच नव्हे तर त्यानी परराज्यातील सुगंधित तंबाखू तस्करासोबत हातमिळवणी केली आहे.त्यामुळे हम करे सो कायदा याप्रमाणे लक्कीचे वागणूक आहे.परराज्यातील सुगंधित तंबाखू तस्करांसोबत मोठी भागीदारी आहे. संबधीत विभाग, पोलीस स्टेशन हे त्यांच्या डाव्या हाताचे खेळ असल्याचे तो नेहमी पत्रकार ,जनप्रतिनिधीना सांगत असतो.
काही वर्षांपूर्वी तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,नितीन गडकरी यांच्यासोबत असलेला एक फोटो सर्व अधिकारी,जनप्रतिनिधी व पत्रकार यांना दाखवून आपले हात वरीष्ठ स्तरावरून बळकट असल्याचे दाखवत असतो. चौकशी व कार्यवाही करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी यांना आपल्या दुकानातील बदाम काजू पिस्ता व महागडी वस्तू देऊन माघारी पाठविण्याचा प्रयत्न करीत असतो.मी कसा निरोगी आहे हे पठवून देण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे बोलल्या जाते.
तंबाखूसारख्या विषारी वस्तू विकून सर्वसामान्य जनतेशी खेळ खेळत आहे.हनिफ विकत असलेल्या विषारी वस्तुमळे अनेकांना अनेक रोगाने ग्रासले आहे. सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांमुळे अनेक तरुण पिढीच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. एका सर्वेक्षणानुसार तोंडाचे 90% कॅन्सर हे तंबाखूच्या सेवनामुळे होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.यासाठी सरकार हजारो कोटी रुपये खर्च करते. दरवर्षी जाहिरातीद्वारे कॅन्सर जनजागृती केली जाते,मात्र हनिफ सारखे अवैध व्यावसायिक या व्यवसायाला चालना देत आहेत.
हनिफचे काही वर्षांपुर्वी छत्तीसगड मधून सुगंधित तंबाखू येत असताना चोरट्यांनी त्यांच्या वाहनाला अडवून वाहनचालकाला चांगलाच चोप दिला होता.वाहन चालकांनी वाहन सोडून पळ काढला होता.मात्र सर्व माल चोरीचा असल्याने हनिफने घटनेची वाच्यता कुठे केली नाही. या घटनेची वार्ता सगळीकडे पसरल्याने हनिफ सुगंधित तंबाखूसह भेसळ तेल विक्री करीत असल्याचे माहीती झाली.इतकेच नव्हे तर चंद्रपूर बल्लारपूर येथील सुगंधित तंबाखू विक्रेत्यांसोबत मनसुख संबंध असल्याची चर्चा सुरू आहे.(पुढील बातमी वाचा हनिफचे सुगंधित तंबाखू विक्री.......)