उद्या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार पत्रकार दिन साजरा



चंद्रपूर गडचिरोली संपादक पत्रकार संघ व्दारे  दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन तथा सत्कार सोहळा दि.६जानेवारी २०२३ दुपारी ४ वाजता चंद्रपूर येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय सभागृह रामाळा तलाव रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.



या कार्यक्रमचे उद्घाटन मा.नाम.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार वने सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय तथा पालकमंत्री चंद्रपूर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी मा. आमदार किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र हे तर विशेष अतिथी म्हणून मा.आमदार सुधाकर अडबाले नागपूर शिक्षक मतदार संघ यांची उपस्थिती राहणार आहे.



या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री रविंद्रसिंह परदेशी, पोलीस अधीक्षक चंद्रपूर,मा.श्री.राजेश येसनकर जिल्हा माहिती अधिकारी चंद्रपूर,मा.श्री विजय पवार तहसीलदार चंद्रपूर,मा.श्री गिरीश कुमरवार मुख्य अभियंता चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन चंद्रपूर,मा.श्री मजहर अली अध्यक्ष श्रमीक पत्रकार संघ चंद्रपूर,मा.श्री.मुकेश टांगले कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ चंद्रपूर यांच्या उपस्थितीत पत्रकार  दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.



या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्राविण्य प्राप्त गुणवंताचा सत्कार करण्यात येणार आह. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संजय कन्नावार,कुमार जुनमलवार,रकिब शेख,शेखर तावडे व सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.