नागभिडच्या लक्कि किराणा दुकानांवर कारवाई होईल का?



चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर व भंडारा जिल्ह्याला लागून असलेल्या नागभिड मध्ये लक्की किराणा दुकानातून दुरवर आपला सुगंधित तंबाखू व भेसळयुक्त तेलाचा व्यापार सध्या चांगलाच फोफावला आहे.जिभेवर साखर ठेवून गोडगोड बोलून अन्न व औषध विभाग,जनप्रतिनिधी व पत्रकार गुमराह करण्याचा प्रयत्न करत आपला धंदा सुरू ठेवला आहे.खुलेआम सर्रासपणे व्यवसाय सुरू असतांना संबधीत विभाग झोपेचे सोंग घेवून आहे.



नागभिड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या लक्की किराणा दुकानातून सुगंधित तंबाखू व भेसळयुक्त तेलाचा व्यवसाय केला जात आहे.सुगंधीत तंबाखू छत्तीसगड व बल्लारपूर चंद्रपूर येथून आणल्या जाते.जयसुख,मनसुखच्या आशीर्वादाने नागभिड पर्यंत सुगंधित तंबाखूचा छुप्या पध्दतीने पुरवठा केला जातो .



सुगंधित तंबाखू व भेसळयुक्त तेल हा महामार्गावर असलेल्या गोदामांमध्ये साठवल्या जाते या गोदामामधूनच किरकोळ विक्रेत्यांना विक्री केली जाते.संबधीत विभाग व पोलीसांचा हप्ता वेळेवर पोहचत असल्याने संबधीत गोदामावर कारवाई करण्याचे धाडस केले नाही.त्यामुळे लक्की किराणा दुकानावर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजकीय वलय असलेल्या  हनिफचे कधीकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत फोटो आहे. तेच फोटो मिरवत आपले काळे धंदे लपविण्याचा प्रयत्न करीत आहे.