कोरपना तालुका प्रतिनिधी:- तालुक्यात सुगंधित तंबाखू जोरात सुरू असतांनाच स्थानिक पोलिस निरीक्षक यांच्या डोळ्यासमोर पोलीस अधीक्षक यांच्या विषेश पथकाने सुगंधित तंबाखू साठा पकडले, २४ तासाच्या आत पुन्हा रेती तस्करांचे चार हायवा जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी धाडसी कार्यवाही केल्याने नागरीकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कोरपना पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप एकाडे हे आहेत.lcb च्या कार्यवाही मुळे ठाणेदार एकाडे यांना चांगली चपराक बसली आहे.
पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्याबाबत अनेकदा अवैध धंदे धारकांना वाट मोकळी करून दिले असून त्याच व्यवहारातून करोडो रुपयांची माया जमवली असल्याचे तक्रार करण्यात आली आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुध्दा तक्रार नोंदवली असल्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे.यापुर्वीचे तात्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांच्या अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे पोलीस निरीक्षक एकाडे यांनी त्यांचा फायदा घेत हम करे सो कायदा या प्रमाणे वगायला सुरूवात केली
तालुक्यातील नागरीकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला.नागरीकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून मोठ्या रकमेची मागणी सुध्दा केली होती मात्र तक्रारी नंतर तो मी नव्हे ची भुमिका घेतली.स्वताची बाजू सावरत एका पोलिस उपनिरीक्षक यांच्या माथी आपले खापर फोडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला व त्या पोलीस उपनिरीक्षकांना न केलेल्या कामाची सजा देत त्यांना चंद्रपूर पोलीस मुख्यालय रवानगी केली.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांनी आल्या आल्या पोलीस खाक्या दाखविल्याने अवैध व्यवसायिक व गुन्हेगारामध्ये दहशत निर्माण झाली त्यांनी अवैधरित्या आलेल्या देशी दारूचा छडा लावीत विशेष पोलीसांना अनेक गुन्ह्यांमध्ये कामी लावले आहे.पदभार स्वीकारताच त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोणतेही अवैध धंदे, गुंडगिरी खपवून घेणार नाही असे स्पष्ट खडसावून सांगितले होते.
कोरपना येथील पोलीस निरीक्षक निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेल्या सुगंधित तंबाखूचा व्यापार व इतर अवैध धंद्यावर पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात लोकल क्राईम ब्रॅन्चने छडा लावल्याने पोलीस निरीक्षक यांच्या पायाखालची जमीनच सरकली असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.पोलीस निरीक्षक यांनी आपल्या कार्यकाळात अवैधरित्या माया जमवली असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.या संपुर्ण घटनेचा तपास पोलीस अधीक्षक करतील काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.