चंद्रपूर (वि.प्र.)
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील ८ & ९ मध्ये क्लीनींग ची कामे सुरू आहेत. ती कामे कंत्राटदार रमेश देशमुख यांच्याकडे आहे त्यांच्या कंपणीत काम करणारे कंत्राटी कामगार ओएस ३ चे क्लिनींगच्या कामात व्यस्त आहे. ओएस ३ चे कार्यकारी अभियंता इटकलकर हे आहेत.
आपला पदाचा गैरवापर करत त्यांनी क्लीगींनच्या कामातील तिन कंत्राटी कामगारांना आपल्या निवासी क्वार्टर नंबर सी-३ मध्ये घरगुती कार्यक्रमासाठी साफसफाई करीता वापर केले असल्याची बातमी चंद्रपूर क्रांती मध्ये प्रसिध्दी करण्यात आली होती.त्या बातमीचा इनफॅक्ट पडल्याने इटकलकर यांची वरीष्ट स्तरावरून चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.
इटकलकर यांना दि.१ फेब्रुवारी २०२४ रोजी कंत्राटदारांच्या कामावरील कामगारांना कौटुंबिक कार्यक्रम असलेल्या ठिकाणी साफसफाईच्या कामाला लावले होते.ही बाब सदर प्रतिनिधींच्या लक्षात येताच त्यांनी इटकलकर यांना विचारले असता क्वार्टर ची साफसफाई करणे गरजेचे होते. त्यामुळे कंत्राटी कामगारांना साफसफाई करण्यासाठी त्यांना सकाळपासून बोलावण्यात आले आहे.
"कंत्राटदाराला यांचा त्रास नाही. तुम्हालाच त्रास होत आहे का?" खोचक सवाल पत्रकारांना केला. "उलटा चोर कोतवाल को डाटे" अशी भुमिका कार्यकारी अभियंता इटलकर यांची होती.याबाबत मुख्य अभियंता यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.मात्र सदर बातमीची दखल घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.या प्रकरणात काय होणार याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे