चक्क लग्नातच उच्चशिक्षित नवरदेवाने केला रासपचा जयघोष It was during the wedding that the highly educated bridegroom gave a shout of rasap



सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये राहणारे चौरगंनाथ पालवे यांच्या मुलाचे लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता या लग्न सोहळ्याला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी कॅबिनेट मंत्री, आमदार राष्ट्रनायक महादेव जानकर साहेब यांच्या उपस्थितीत नवरदेवाने राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो अश्या घोषणा दिल्याने उपस्थितांनी नवरदेवाने कौतुक केले.



सोलापूर जिल्ह्यातील अकूलगाव ता.माढा येथील संदीपान सुर्यभान पालेकर यांचा मुलीचा विवाह मलबडी ता.करमाळा येथील चौरंगनाथ बंडू पालवे यांच्या मुलांसोबत दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी रामानंद सरस्वती मंगल कार्यालयात फार पडला, या लग्न सोहळ्याला राष्ट्रनायक माजी मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांच्या सह राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.



विशेष बाब म्हणजे नवरदेव मुलगा गणेश पालवे हा बि.ई.आय.टी. उच्चशिक्षित असून नवरदेवाने रासपच्या जयघोषाचा नारे लावल्याने रासप व त्यांचे संस्थापक महादेव जानकर यांची प्रतिमा सर्व सामान्यामध्ये किती मोठी आहे याचा प्रत्यय येतो.राजकारणामध्ये आजपर्यंतचा इतिहास बघता मोठ्या पक्षापेक्षा राजकिय नेत्यांची प्रतीभा कशी आहे.यावरून त्या राजकीय पक्षाचे भवितव्य अवलंबून असते.



चौरंगनाथ पालवे यांना महादेव जानकर यांनी २०१४ रोजी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती . ते या निवडणूकीत पराभूत झाले मात्र जानकर यांनी दिलेल्या उमेदवारीमुळे त्यांच्या मनात राष्ट्रीय समाज पक्ष घर करून दिले आहे. सर्वसामान्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या जानकरांसाठी आणि रासपासाठी पालवे यांचे कुटुंबीय सदैव सोबत असल्याचे दिसून आले आहे.



लग्नाच्या बेडीत अडकलेल्या या उच्चशिक्षित तरुणाला ही रासपचे कार्य सर्वश्रुत असल्याने जोशात नववधूसमोरच "राष्ट्रीय समाज पक्षाचा विजयी असो ""असा नारा दिल्याने संपूर्ण वऱ्हाडी सुध्दा काही काळ रासपमय झाले होते.