नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे.सर्व पोलीस स्टेशनला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.मात्र त्यांच्या आदेशाला झुगारून काही पोलीस स्टेशन अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवैध व्यवसायिकांना खुली सुट दिली आहे. नागभिड येथील हनीफ (लक्की किराणा) तालुक्यातील सर्वात मोठे सुगंधित तंबाखूचे व्यावसायिक आहेत. त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
नागभिड मध्ये भरवस्तीत किराणा दुकानाच्या आड सुगंधित तंबाखू विक्रीचा व्यवसाय आहे.छत्तीसगड मधून सुगंधित तंबाखू आणल्या जाते.यापुर्वी चोरट्यांनी छत्तीसगड मधून सुगंधित तंबाखू आणत असताना चालकाला मारहाण केली होती.चोरीचा मामला असल्याने हनीफ ने हळूहळू बोंबलने सुरू केले.या घटनेची तक्रार सुध्दा केली नाही.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी आपल्या पदाचे सुत्रे हाती घेताच सुगंधित तंबाखूजन्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याची सर्व पोलीस स्टेशन ला आदेश दिले आहेत.मात्र नागभिडच्या पोलीसांनी सुगंधित तंबाखू व्यवसायीक हनीफ वर आतापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही.हनीफ सोबत पोलीसांचे मधूर संबंध असल्याने अर्थपूर्ण व्यवहारातून कार्यवाही टाळण्यात येत असल्याचे लघु व्यावसायिक यांचे कडून बोलल्या जात आहे.