चंद्रपूर (वि.प्रति.)
सन २०२४ ची १७ वी लोकसभा( loksabha )निवडणूक अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. केंद्र सरकारच्या निर्णयांवर अनेकांची नाराजी तर आहे परंतु लहान-लहान पक्षांना संपविण्याच्या केंद्राच्या धोरणामुळे लहान पक्षांचे नेते व त्यांना मानणाऱ्या वर्गामध्ये असंतोष आहे. या असंतोषाची झळ महाराष्ट्रातील भाजप उमेदवारांना ही मोठ्या प्रमाणात बसणार असून भाजप उमेदवारांसाठी ती धोक्याची घंटा आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी (chandrapur wani arni)लोकसभेसाठी भाजपने मुनगंटीवार mungantiwar यांना तिकीट देऊ केले आहे.
महाराष्ट्रात आपली वेगळी छवी निर्माण करणाऱ्या मुनगंटीवार यांना ही निवडणूक जिंकणे सहज शक्य होणार नाही, असे बोलल्या जात आहे. त्यात तथ्यही आहे. चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात धनगर समाजाची संख्या निर्णायक आहेत, धनगर समाजाची भाजपवर नाराजी मुनगंटीवारांना "डेंजर झोन" नेऊन त्यांना "एक्झिट" निश्चित करू शकते.
यापूर्वी २०१४ मध्ये धनगर समाजाचे कोणतेही सोयरसुतक, समस्यांची जाण नसलेल्या एका उच्च शिक्षित बैनरबाज नेत्याला चंद्रपूर भाजपची जबाबदारी देऊन मुनगंटीवार भाऊंनी धनगर समाजाची ओढवून घेतलेली नाराजी "तो" चमकोगिरी करणारा एअर कंडिशनिंग नेता ही आता दुर करू शकणार नाही. ओबीसी obc सोबतचं धनगर मतांचा ही फटका "भाऊं" ना बसु शकतो.
2014 मध्ये धनगर समाज आरक्षणाच्या नावाखाली संपूर्ण धनगर समाज एकवटला आणि महायुतीची सत्ता आली. त्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे rastriya samaj party महादेवराव जानकर Mahadev jankar यांची महत्त्वाची भूमिका ठरली मात्र यावेळी धनगर समाजाच्या एकाही उमेदवाराला उमेदवारी न दिल्याने व राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीत समाविष्ट न केल्याने धनगर समाजात नाराजी पसरली आहे आणि त्याचा फटका या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसणार आहे.
महाविकास आघाडीने राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेण्याचे सुतोवाच शरद पवारांनी Sharad pawar केल्याने व माढा लोकसभा क्षेत्राची उमेदवारी शरद पवार यांनी जानकर यांना घोषित केली आहे. महाविकास आघाडीने धनगर समाजाला उमेदवारी दिल्यास धनगर समाज हा तन-मनाने महाविकास आघाडीसोबतचं राहील यात शंका नाही.
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात धनगर समाजाची व राष्ट्रीय समाज पक्षाची निर्णायक मते आहेत. महायुतीच्या सरकारने गेल्या दहा वर्षात धनगर समाजासाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडला मात्र एकही अस्तित्वात न आल्याने धनगर समाज तूर्तास नाराज आहे.
फडणवीस सरकारने 2019 मध्ये धनगर समाजाला आदिवासींच्या धर्तीवर 1000 कोटीची तरतूद केली मात्र ते 1000 कोटी अजूनही धनगर समाजाच्या उन्नतीसाठी फायदा झालेला नाही. २०१४ मध्ये धनगर समाजाच्या बिळात भाजपाचे नवखे शिरले. भाजपने त्यांना मोठे केले मात्र तळागाळात राहणारा धनगर समाजाला वंचित ठेवण्यात आले.
यापूर्वी धनगर समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. बदल म्हणून व आरक्षणाचा तिढा कायम सुटेल या आशेने महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याची किमया धनगर समाजाने केली. महायुती सरकारने "गरज सरो वैद्य मरो" अशी भूमिका घेतल्याने यावेळी धनगर समाजातील एकही उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारीवर रोष व्यक्त केले जात आहे.
चंद्रपूर, वणी आणि आर्णी क्षेत्रात लोकसभेसाठी सुधीर मुनगंटीवार यांना उभे केले आहे मात्र धनगर समाजाचा रोष बघता आणि राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीत समाविष्ट न केल्याचा भाजपाचा राग चंद्रपुर-वणी-आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे उमेदवार मुनगंटीवार यांना यावेळी चांगलाच फटका बसणार असल्याचे दिसत आहे.