चंद्रपूर :-
उन्हाळ्याचे चाहुल लागताच थंड पाण्याचा धंदा जोरात सुरु झाला आहे, दरम्यान उन्हाचे चटके सोसत थंडगार पिण्याची बॉटल हवीच अशी इच्छा सर्वांची असते. अनेक हाॅटेल व दुकानातून अनेक कंपन्याच्या पिण्याच्या बॉटल्स विक्री केली जाते. मात्र रिडा (reeda) कंपणीच्या पाण्याच्या बॉटल्स मध्ये कचरा आढळला असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे, या कंपनीच्या बाॅटल्स मधून कचरा असलेल्या व शुध्द न केलेल्या पाण्याची विक्री सऱ्हासपणे केली जात आहे
रिडा कंपणी ही कोहीन्यूर ॲक्वा प्रोडक्ट कोठारी रोड,केमरीठ बाम्हणी बल्लारपूर जि.चंद्रपूर येथून बाटलीबंद पाणी पुरवठा केले जाते.या कंपनीला अन्न व औषध विभागाने प्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे.मात्र कोणतीच प्रक्रिया न करता बाटली बंद पाणी विक्री केली जात आहे. अन्न व औषध विभागाच्या दुर्लक्षामुळे कंपणी अशुद्ध पाणी विक्री करीत आहे.अधिकाऱ्यांची अश्या कंपन्यांवर कृपा दृष्टी असल्याने कंपणी सर्रासपणे अशुद्ध पाण्याची विक्री करीत आहे.
रिडाच्या बाटलीवर रिडा चा आस्वाद घ्या, या बाटलीमध्ये U.V. द्वारे प्रक्रिया केलेले पाणी. उपचार, रिव्हर्स ऑस्मोसिस, ओझोनायझेशन, कार्बन फिल्टरेशन आणि वाळू गाळणे, शुद्धीकरण प्रणाली जर गाळ दिसत असेल किंवा सील तुटला असेल तर खरेदी करू नका असे बाटलीवर स्पष्ट लिहीले आहे. मात्र त्याच बाटलीतून कचरा आणि किडे असलेले बाटली ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहे.रिडा ॲक्वा प्रोडक्ट कंपनी ही ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असल्याने रिडा कंपनीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.