राष्ट्रीय समाज पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष मुंबई ते नागपूर या समृध्दी महामार्गाने सहकाऱ्यांसह परतीच्या वाटेने निघाले होते.औरगाबाद जवळ नादूरूस्त असलेल्या उभ्या ट्रक वर आदळल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांच्या सह साखरवाडे यांचा मृत्यू झाला.
नुकताच राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेव जानकर साहेब यांचा फेब्रुवारी मध्ये चंद्रपूर भंडारा जिल्हा दौरा आयोजित होता. जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके यांनी जानकर यांचा विवीध कार्यक्रम आयोजित करून दोन दिवस कार्यक्रमात व्यस्त ठेवले होते.इतक्या मोठ्या कार्यक्रमामुळे जानकर सुध्दा खुष झाले होते.जानकर यांचे माढा लोकसभा नंतर परभणी लोकसभा मतदारसंघात विजय निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
त्या कार्यक्रमासाठी महादेव जानकर व्यस्त असतानासुद्धा स्वरूप रामटेके यांची भेट घेत त्यांना मार्गस्थ केले होते.त्यामुळे रामटेके हे जानकर साहेब यांना गुरूवारी भेटून शुक्रवारी सकाळी परतीच्या मार्गे लागले होते.शिर्डी दर्शनानंतर भंडाराकडे रवाना होत असतानाच औरंगाबाद जवळ नादुरुस्त असलेल्या cg 15 db 7158 या क्रमांकाच्या नादुरुस्त ट्रकला धडक दिल्याने मागे बसून असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्ववरूप रामटेके पक्षाच्या साखरवाडे यांना जबर मार बसला साखरवाडी यांचा जागीच मृत्यू झाला तर स्वरूप रामटेके यांचा औरंगाबाद येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.
शोकसंदेश
राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येयधोरणे ताडागडात पोहोचवण्याचे काम भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये स्वरूप रामटेके हे करीत होते. मात्र त्यांचा दुर्दैवी अपघात झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे त्यांच्या दुःखात राष्ट्रीय समाज पक्ष सदैव राहील, नुकताच त्यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे विविध कार्यक्रम घेऊन पक्ष वाढीचे काम करत होते, त्यांच्या या दुःखद निधनाने राष्ट्रीय समाज पक्ष भंडारा, गोंदिया मध्ये पोरके झाल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आमदार महादेवराव जानकर व्यक्त केले.