चंद्रपुर (वि.प्र.)
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे जुळ्या जिल्हा गडचिरोली येथे कांग्रेस उमेदवारांचा प्रचार करतांना गडचिरोली चे भाजप उमेदवार अशोक नेते यांचे विकास कामे दाखवा पाच लाखांचे बक्षिस मिळवा, असे मतदारांना आवाहन करीत फिरत आहे मग चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी हा मुद्दा भिन्न कां ? याच कारणाने बहुतेक ९ तारखेपासून कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी येण्याची "सिंहगर्जना" करणारे वडेट्टीवार चंद्रपूरात प्रचारासाठी आले नाही? अशी चर्चा वडेट्टीवार समर्थकांमध्ये सुरू आहे. प्रचारसभेत वडेट्टीवार यांना संबोधून कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी "अजाण" व "अज्ञानता" मुळे ट्रोल केलेल्या "त्या" भाषणाची ही सध्या वडेट्टीवार समर्थकांमध्ये सध्या चर्चा सूरू आहे.
हेही नक्की वाचा
फडणवीसांच्या त्या पत्रात दडलं तरी काय
नुकतेचं शुक्रवार दि. १२ ला राजुरा येथील प्रचार सभेत भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी "मी तीनशे विकासकामे केली, त्यांनी एकवीस तरी सांगावीत!" असे कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना केलेले आवाहनाला कांग्रेस उमेदवार उत्तर देवू शकतील काय, याच्या चर्चा आत्ता मतदारांमध्ये रंगु लागल्य "२१ विकासकामे दाखविण्याचे मोठे आवाहन कांग्रेस उमेदवार यांच्यासमोर उभे ठाकले आहे.
लोकसभा निवडणुकीची चंद्रपूर जिल्ह्यात रणधुमाळी सुरू झाली असताना आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाच्या मुद्यावर आपण निवडणुक लढविणार असल्याचे पुर्वी चं जाहीर केले होते. कांग्रेसचे उमेदवार या आमदार आहेत. त्यांनी केलेली विकासकामे मतदारांपुढे मांडावीत व मतांचा जोगवा मागतील, असे गृहीत होते.
परंतु तसे न होता मतदारांची दिशाभूल करून, विकासाच्या मुद्यावरून भटकवून खालच्या दर्जाचे राजकारण कांग्रेस उमेदवारांकडून मतदार संघात होत असल्याचे दिसत आहे. राजुरा येथील प्रचार सभेत मुनगंटीवार यांनी मी तिनशे विकासकामे दाखवतो, त्यांनी फक्त एकविस कामे दाखवावी!" असे कांग्रेस उमेदवाराला केलेले आवाहन कांग्रेस उमेदवाराला खुले आवाहन दिले आहे.या आवाहनाला कांग्रेस उमेदवार सामोरे जातात की सोशल मिडिया ची टीम कामाला लावून दिशा भटकवितात याकडे आत्ता सर्वांची नजर लागली आहे.