पंतप्रधान मोदींची सभा जानकरांसाठी मास्टरस्ट्रोक ठरणार!

 


परभणी :- महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परभणी शहरात २० एप्रिल २०२४ - रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी महायुतीच्या सर्व नेत्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. यामध्ये गंगाखेडचे आमदार - रत्नाकर गुट्टे, जिंतूरच्या आमदार मेघनाताई बोर्डीकर, आमदार. बाबाजानी दुराणी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष - राजेश विटेकर यांच्यसह सर्व नेते, - पदाधिकारी कामाला लागले आहेत. 


बैठका, संवाद सभा, कॉर्नर मीटिंगवर सर्वानी जोर दिल्याचे दिसते. सर्वजण पंतप्रधान मोदी यांची परभणीतील सभा रेकॉर्डब्रेक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मोदी यांची सभा महादेव जानकर यांच्यासाठी मास्टरस्ट्रोक ठरण्याची चिन्ह आहेत. स्वतः जानकर आपल्या प्रचारामध्ये मोदींच्या सभेला येण्याचे मतदारांना आवाहन करत आहेत. ४० एकर मैदान, तीन हेलिपॅड : परभणी शहरातील लक्ष्मी नगरीत यापूर्वी शिव महापुराण कथा प्रदीप मिश्रा व हनुमान कथा पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या घेण्यात आलेली जागा आहे. त्यामुळे सदरील जागा ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माहित आहे.


 ४०चाळीस एकर मध्ये पंतप्रधानांची सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे. सगळीकडे जाताना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच परभणीच्या बायपास मार्गावरच तीन हेलिपॅडची व्यवस्था जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. ही सभा दिनांक २० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या सभेसाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी हे संपूर्ण सुरक्षेचे दृष्टिकोनातून पाहणी करीत आहेत. 



परभणी लोकसभेच्या प्रचारकार्यात नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारकार्यात भाजप पक्षाच्या आमदार मेघना बोर्डीकर, गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस 

पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, राजेश विटेकर, प्रताप देशमुख यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोट बांधून प्रचारयंत्रणा राबविली आहे.




 राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड व सेलुचे माजी नगरध्यक्ष विनोद बोराडे सर्वजण प्रचारात गुंतले आहेत. नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व सर्व तालुक्यातील नगरसेवकांच्या भेटीगाठी घेऊन परभणी लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रासपचे महादेव जानकर यांच्या बाजूने मतदानाचा कौल देऊन भरघोस मतांनी निवडून आणावे असे आवाहन करीत आहेत.