त्या भाजप प्रचार रथाला हाकलून लावल्या प्रकरणी सरपंच संघटनांचा निषेध




वणी आर्णी तालुक्यात दारू व्यवसाय फोफावलेल्या बारभाई ग्रा.प चे सरपंच प्रदीप जावध यांनी धानोरकर बाईच्या घोटभर दारूसाठी दादागिरी दाखविली. आज त्यांच्या गावात आलेल्या भाजपाच्या प्रचार वाहनाला थांवबून लोकशाहीप्रधान देशात निवडणूक नियमाची पायमल्ली केली. गावचा सरपंच असलेल्या या व्यक्तीने आपल्या गावात काय दिवे लावले, याची चर्चा आता होऊ लागली आहे.


लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला चांगलेच रंग चढले आहेत. उन्हाचा पारा चढला असताना निवडणुकीचा पाराही तितकाच उंचावला आहे. लोकशाहीत मतदानाचा अधिकार सर्वांना आहे, हे खरं आहे. मात्र, एखाद्या उमेदवाराची प्रचार वाहने आपल्या गावातून परतवून लावणे कितपत योग्य आहे?


एखाद्या गावात अनेक पक्षांचे समर्थक असतात. एखाद्या पक्षाला उघडपणे विरोध करणे हे लोकशाहीच्या मूल्यांशी विसंगत आहे. नुकतेच, बारभाई ता. वणी येथील सरपंच प्रदीप जाधव यांनी जाणूनबुजून प्रचार वाहनाला हाकलून लावून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. सरपंच सारख्या व्यक्तीने एखाद्या पक्षाला बदनाम करण्यासाठी असे प्रयत्न करणे चुकीचे आहे.


अशा कृतीमुळे गावात अराजकता आणि तणाव निर्माण होऊ शकतो. हा सरपंच मुजोर आणि हुकूमशहा सारखा वागतो. गावात दादागिरी करतो. लोकांवर दबाव टाकून दादागिरी करीत असल्याची गावात चर्चा रंगली आहे.
अशा कृतीमुळे लोकशाहीची मूल्ये कमकुवत होतात. अशा चुकीच्या कृतींचा विविध सरपंच संघटनानी निषेध केला आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.