चंद्रपूर (का.प्रति.)
निवडणुकीच्या प्रचाराला धडाक्यात सुरूवात झाली आहे. प्रचार फलकांतून वातावरण निर्मिती करण्यात कांग्रेस अग्रस्थानी आहे. बहुतेक पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे आपल्या उमेदवारांचा प्रचार फलक "मोक्याच्या" ठिकाणी दर्शनी भागात असावा, जास्तीत जास्त लोकांच्या नजरेत पडावा या हेतुने लावण्याचा प्रयत्न करतात.
हेही नक्की वाचा
२१ कामे दाखविण्याचे मुनगंटीवार यांनी केलेले आवाहन काॅग्रेस उमेदवारांसाठी धर्मसंकट
पोंभुर्णा तालुका का़ग्रेसचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती रवि मरपल्लीवार यांच्या "देशी दारू" दुकानाच्या समोर कांग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार फलक *एकाचे "सतरा" झाले, तुम्ही साथ दिली तर "सत्तर" करू....!* असा "सुचक" व अत्यंत बोलका आहे. सुजाण मतदार या फलकाकडे पाहून "देशी" साठी नाही "देशा" साठी मतदान करायचा संकल्प करीत आहेत.