मुल - राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती जुनासुर्ला येथे थाटामाटात साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून मूळचे जुनासुर्ला येथील राकेश अलीवार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत पीएसआय म्हणून नियुक्त झाल्याने त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले व 10 वी, 12 वीत प्रवीन्य प्राप्त करणाऱ्या विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
31 मे रोजी जुनासुर्ला येथे अहिल्याबाई होळकर यांची 299 वी जयंती साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून,दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मूळचे जुनासुर्ला येथील मेंढपाळ बंडूजी अल्लीवार हे आपल्या उदरनिर्वाहासाठी दोनाळा येथे स्थायिक झाले. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांचा मुलगा राकेश अल्लीवार हे पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्त झाल्याने आई वडिलांसह सत्कार करून समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी त्यांनी जिद्द, चिकाटी असेल तर प्रतिकूल परिस्थित आपण यशस्वी होऊ शकतो असे प्रोत्साहित केले तसेच इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी तील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शिल्ड व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी नवनियुक्त समाज अध्यक्ष, गाव प्रमुख, उपप्रमुख, धनगर समाज कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव यांचेही जाहीर सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जुनासुर्लाचे अध्यक्ष माणिक पाटेवार, उद्घाटक समाज अध्यक्ष बिराजी कंकलवार, मल्लाजी कोरीवार , जानुजी मिडपलवार, बोन्ताबाई कन्नावार , श्वेताताई रामेवार, सरिकाताई भुमलवार- मल्लाजी पाटेवार, मुखरूजी कोमावार, बंडुजी अल्लीवार, पोचूजी येग्गेवार, श्री मुखरुजी पाटेवार, आसुजी चिठ्ठावार, तुळशीदासजी भगतवार, मुकेश इन्मुलवार, गौरव रामेवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश मद्रिवार यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार मनोज कोमावार यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय मल्हार सेनेचे सदस्य किशोर सूरेवार, भीमराव धुडेवार ,परशुराम रामेवार ,शंकर देवलवार, गणेश ईदुलवार, गंगाधर धुडेवार , रामुजी कोरेवार , दिलीप भूमलवार , प्रकाश इनमुलवार आणि दिनेश रामेवार यांनी सहकार्य केले