गडचिरोली जिल्ह्यात झाडें कुणबी ही जात फार मोठ्या प्रमाणात असून इतर मागास प्रवर्गात येते. परंतु झाडें कुणबी या जातीतील कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक 15 वरील झाडें या पोटजातीचा आधार घेऊन स्वतःला भटक्या जमाती (क) प्रवर्गातील असल्याचे दाखवून खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीमध्ये नियुक्त झालेले आहेत. यातील अनेकांचे जात वैधता प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समिती गडचिरोलीने अवैध ठरवलेले आहेत.त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी धनगर समाजाचे शिष्टमंडळानी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची गडचिरोली निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.
गडचिरोली पोलीस भरती 2021 मध्ये निशांत परशुराम गोटेवार ,श्रीकृष्ण दशरथ दुबलवार ,समृद्धी किसन पुरकलवार या बोगस झाडे उमेदवारांची भटक्या जमाती (क) प्रवर्गातून निवड होऊन नोकरीत रुजू झालेले आहेत. या उमेदवारांचे व्हॅलिडिटी अवैद्य झाल्याने यातील श्रीकृष्ण डुबलवार याचेवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे मात्र इतरांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याबोगस पोलिसांवर बडतर्फीची कारवाई करून खोटे जात प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी बाळकविल्याने फौजधारी गुन्हे दाखल करण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली.
गडचिरोली पोलीस भरती 2022 मध्ये अशाच पद्धतीने एन.टी. (सी) प्रवर्गात विनोद रोहिदास मंतकवार, सचिन देवराव मादावार, सुभाष जनार्धन गुटेवार, विजय लक्ष्मण ओडेंगवार, कोमल शिवराम ओडेंगवार, मंगला लक्ष्मण मंतकवार, पालेश्वरी साईनाथ मुलकलवार, शुकला तुळशीराम येलमुले, आचल चिनू चौधरी, मीना तुळशीराम नेट्टीवार या बोगस झाडे कुणबी उमेदवारांची निवड यादीत नावे आली होती. या यादीवर आक्षेप घेत जात वैद्यता प्रमाणपत्र अवैद्य ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची पुराव्यासह प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी व धनगर समाज संघटनानी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना रुजू करून घेतलेले नाही.
मात्र सचिन मादावार व पालेश्वरी मुलकलवार यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैद्य झाले असतांनाही त्या बोगस उमेदवारांवर गुन्हे दाखल करून नियुक्ती रद्द करण्यात आलेली नाही व इतरांचेही व्हॅलिडिटी अवैध ठरविण्यात आलेले असतानाही त्यांचेवर बडतर्फीची कारवाई व फौजधारी गुन्हे दाखल करण्यात आलेले नाही.
राज्य राखीव पोलीस बल क्र. 18 काटोल नागपूरच्या वतीने सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2021 या भरतीत झाडे कुणबी या जातीतील उपरेश गोविंदा शेट्टीवार, लुमेश पुंडलिक पेडलवार, अरुणेश्वर आनंदराव चौधरी, गणेश चरणादास बर्लवार, साहिल विजय तुंकलवार हे सर्व बोगस एन. टी. (सी) चे व्यक्ती रुजू झालेले आहेत. त्यांचीही व्हॅलिडिटी रद्द झालेली आहे मात्र त्यांचेवर काहीच कारवाई झालेली नाही.
वरील बोगस व्यक्तींवर कारवाई करून गडचिरोली पोलीस भरती व राज्य राखीव पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील खऱ्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी व ज्या बोगस झाडे उमेदवारांची व्हॅलिडिटी प्रलंबित आहे त्यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी जिल्हा जात पडताळणी समिती गडचिरोली यांना निर्देश द्यावे.असे या शिष्टमंडळाव्दारे करण्यात आले यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभागीय अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार, धनगर समाज संघटक संजय कन्नावार, धनगर समाज संघटक विजय कोरेवार, धनगर अधिकारी कर्मचारी गडचिरोली अध्यक्ष डॉ नारायण करेवार,माणिक पाटेवार,लच्छमा सिर्गावार, अशोक काळीवार,विस्तारी फेब्रुवारी, वसंत मेढेवार, मारुती आरेवार, मारुती कोरेवार, विजय कंकलवार ,महेश अल्लीवार ,सुरेश डंकरवार, दीपक कोरेवार ,राजाराम उइनवार, प्रवीण लंबूवार सोनाली कंकलवार, सुरेश कन्नमवार ,अक्षय पेद्दीवार व प्रतीक्षा यादीतील बहुसंख्य उमेदवार उपस्थित होते.