मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे.चिचपल्ली,अजयपूर,टेमटा,पिंपळखुट,चक पिंपळखुट,हळदी,निबांळा,चक निंबाळा, पेंढरी ,जुनासुर्ला गडीसुर्ला या गावातील नागरीकांचा घरात पाणी शिरले आहे.अती पावसामुळे, वैनगंगा अंधारी नदीला पुर आला आहे.सकाळपासून पुराचे पाणी कमी न झाल्याने गडचिरोली मुल चंद्रपूर मार्ग बंद करण्यात आले असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.आज मार्ग सुरू करणे शक्य नसल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पुन्हा २४ तासात मुसळधार पावसाचा इशारा,
येत्या २४ तासांत भंडारा, चंद्रपूर येथे काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा शासनाने दिले आहे.