घरदार, संसार नसलेला सामाजिक कार्यासाठी समर्पित असा महादेव जानकर यांच्या प्रवास!



विधान परिषदेत आमदार असलेले महादेव जानकर यांच्या कार्यकाळ नुकताच विधान परिषदेत संपला आहे. इंजीनियरिंग पर्यंत शिक्षण घेतलेले समाज कार्याला स्वतःला समर्पित केलेले जानकर यांनी तळागाळातील समाज बांधवांची नाळ जुळत आपला पक्ष वाढविला नुकतीच त्यांनी परभणी विधानसभा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली त्यात त्यांना पराजय पत्करावा लागलं परंतु हार न मानता पुन्हा त्याच ताकतीने ते उभे राहिले आहेत या त्यांच्या लढाऊपणा ची विधान परिषदेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरून प्रशंसा केली. 

हेही बघा

जानकरांचा थक्क करणारा प्रवास

महादेव जानकर म्हणजे समाजकार्यासाठी समर्पित व्यक्तिमत्व आहे. ना घर न संसार शिक्षण मात्र इंजीनियरिंग झालेले परंतु शिक्षणानंतर कोणतीही उच्चपदस्थ नोकरी न करता गावोगावी फिरून स्वतःच्या पक्ष व धनगर समाजाला एकत्रित करण्याचे कार्य जानकर यांनी केले तळागाळातील कार्यकर्त्यांना राष्ट्रीय समाज पक्षात जोडण्यात त्यांनी आपले आयुष्य खर्च केले व आज राष्ट्रीय समाज पक्ष राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपलं अस्तित्व निर्माण करून आहे ते महादेव जानकर यांच्या परिश्रमामुळेच ! समाजकार्याला समर्पित असलेले महादेव जानकर आज तळागाळातील बांधवांपर्यंत पोहोचले आहेत. 


राज्यामध्ये त्यांनी एकदा मंत्रीपद ही भुषविले परंतु कोणताही लवाजमा किंवा मोठेपणा त्यांनी अंगी आणला नाही म्हणून त्यांनी आपला पक्ष व कार्यकर्ते टिकवून ठेवले आहे. नुकतीच पार पडलेली परभणी लोकसभेची निवडणूक त्यांनी लढविली या निवडणुकीत सकाळी उठायचं एखाद्या गावात ठाण मांडायचं ज्या ठिकाणी पहिली सभा होत आहे त्याच गावात आपलं बस्थान मांडायचं एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी रात्री जेवण करायचं, त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या प्रवास पुन्हा तसाच सुरू ठेवत आपलं प्रचार कार्य करायचे हा त्यांच्या साधेपणा सर्वांना गेला. 


पराजय मिळाला म्हणून त्यांनी लढणं सोडलं नाही हा त्यांच्या लढाऊपणा व समर्पित वृत्ती यामुळे त्यांच्या पक्ष भविष्यात नक्की मोठा होईल व त्यांना भरभरून यशही मिळेल अशा शुभेच्छा विधान परिषदेतून निवृत्त होताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिल्या. राष्ट्रीय समाज पक्ष मागील काही वर्षापासून राज्यामध्ये धनगर समाजाची नेतृत्व करीत आहे महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांनी राज्यातील गावागावातील धनगर समाजातील तरुणांना एकत्रित करून या पक्षाची केलेली स्थापना फार काही सांगून जाणारी.