ओबीसी नेते,रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर रविवारी वर्ध्यात



 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भासह महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष विधानसभा निवडणुक स्वबळावर लढविणार आहे.त्याच निमित्ताने राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री मा.आमदार राष्ट्रनायक महादेव जानकर संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत.त्याचाच एक भाग विदर्भाच्या वर्धा जिल्हा दौरा आयोजित केला या दौऱ्या दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अधिवेशन २८ जुलै २०२४ रविवारला दु.१२:३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह वंजारी चौक, वर्धा येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनासाठी प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. महादेवराव जानकर, राज्याचे माजी मंत्री व वर्धा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उपस्थित राहणार आहे.


जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे. आधिक नुकसान झाले आहे. ज्यांच्या व्यथा व वेदना समजुन घेणार आहे. असंघटीत कामगारांच्या - मागण्यांचा आढावा घेतील. ओ.बी.सी. व मागासवर्गीयांच्या भावना समजुन घेण्यासाठी अधिवेशनाचे आयोजन करण्यान आले आहे. चिंतन व मंथन करण्यात येईल.या अधिवेशनासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ अध्यक्ष डॉ तौसीफ शेख, विदर्भ महासचिव संजय कन्नावार, विदर्भ सचिव गणेश मानकर शिवदास अक्कलवार, प्रदेश सदस्य नानासाहेब देशमुख, विदर्भ संघटक प्रा. राजु गोरडे आदी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. राजेंद्र वाघमारे, राजु भगत, प्रताप पाटील, नागोराव देवासे, धनराज लोखंडे, सचिन डाटाके, चंद्रशेखर भंडे, जितेंद्र गोरडे, नितीन सुळे, नजीर शेख, पद्माकर कांबळे यांच्यासह अनेकांनी केले आहे.